‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’आहे तरी काय?

0
20200815_134753

नवी दिल्ली, दि. 15 ऑगस्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाानिमित्त लाल किल्यावरून देशाला संबोधित करताना आत्मनिर्भर भारत, कोरोना विरुध्दचा लढा, राम मंदिर या मुद्द्यांचा उल्लेख केला. भारतात करोनावर एक नाही, दोन नाही तर तीन लशींची चाचणी सुरू आहे. तज्ज्ञांकडून जेव्हा हिरवा कंदिल मिळेल, तेव्हा या लशीचं उत्पादन मोठ्या संख्येत करण्यावर भर असेल. प्रत्येक गरजवंतापर्यंत ही लस पोहचवण्यासाठी आराखडाही तयार करण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी आज ‘नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन’ ची  घोषणा केली. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन भारताच्या आरोग्य क्षेत्रात नवी क्रांती घेऊन येईल. या अभियानांतर्गत प्रत्येक तपासणी, प्रत्येक आजार, तुम्हाल कोणत्या डॉक्टरने कोणते औषध दिले, कधी दिले, तुमचे रिपोर्ट काय होते ही सर्व माहिती या एकाच हेल्थ आयडीमध्ये असेल.

असे असेल नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन
या मिशन अंतर्गत डॉक्टरांच्या माहितीसह देशभरातील आरोग्य सेवांची माहिती एकाच अॅपवर उपलब्ध होईल.
हे अॅप डाउनलोड करून तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. ज्यानंतर तुम्हाला एक हेल्थ आयडी मिळेल.
आपल्यावर केलेले उपचार व तपासण्यांची माहिती डिजिटली जतन करावी लागेल.
जेव्हा कोणत्याही रुग्णालयात किंवा डॉक्टरकडे उपचार घेण्यास जाल तेव्हा सर्व कागदपत्रं किंवा रिपोर्ट्स घेऊन जाण्याची गरज नसेल.
डॉक्टर आपल्या युनिक आयडीद्वारे सर्व वैद्यकीय तपासणी अहवाल पाहू शकतील.
यासाठी रजिस्ट्रेशन ऐच्छिक असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *