शिंदे सरकारला मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहुर्त काही मिळेना !

0
NCP 33

शिंदे सरकारला मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहुर्त काही मिळेना !

मुंबई, दि. ५ ऑगस्ट –
मंत्रीमंडळाचा विस्तार करणार असे जवळजवळ २० वेळा बोलूनही शिंदेसरकारला मुहुर्त मिळेना आणि आजचाही मुहुर्त टळला आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.

राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केलेली नाही शिवाय शेतीचे सरकारकडून अद्याप पंचनामे पूर्ण केलेले नाही. द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला असताना मंत्रीमंडळाचा विस्तारही होईना ही दुर्दैवी बाब आहे असेही महेश तपासे म्हणाले.

हे शिंदे सरकार संविधानिक आहे की नाही याबाबत सुप्रीम कोर्टात दावे – प्रतिदावे सुरू आहेत. तिकडे सगळा वेळ दोघांच्या सरकारला द्यावा लागतो आहे मात्र राज्यातील शेतकरी अडचणीत सापडला आहे त्याला मदत किंवा दिलासा द्यायला वेळ नाही असा आरोप करतानाच शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *