‘त्या’ हल्ल्याबाबत शिवसेनेला बदनाम करू नये

0
images (8)

‘त्या’ हल्ल्याबाबत शिवसेनेला बदनाम करू नये.

पुणे, दि. 3 ऑगस्ट:
पुण्यात कात्रज याठिकाणी शिवसेनेची सभा झाल्यानंतर परतत असताना काही व्यक्तींनी माजी मंत्री उदय सामंत यांच्या गाडीची काच फोडून हल्ला करण्याचा प्रयत्न केला असे दिसून येत आहे. या सगळ्या घटनेमध्ये कोण आहेत हे नक्की स्पष्ट होत नाही, तोपर्यंत हा हल्ला करणारे शिवसैनिकच आहेत किंवा तो हल्ला पूर्वनियोजित हेमोता अशा पद्धतीचे आरोप करून शिवसेनेला बदनाम करू नका असे शिवसेना नेत्या नीलम गो-हे यांनी स्पष्ट केले आहे.

या हल्ल्यासंदर्भात नीलम गो-हे म्हणतात की, आमच्या सभेच्यामध्ये आदित्य साहेबांनी जे भाषण केलं, आमची जी भाषणे झाली ते संपूर्णपणे लोकशाही चौकटीतलेच विचार मांडलेले होते. उलट ज्यांना शिवसेनाची भूमिका पटत नाही त्यांनी स्वतः राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावं असं म्हटलं होते. त्याच्यात कुठल्याही प्रकारचं गाडी फोडण्याच्या घटनेशी या भाषणांचा कुठलाही संबंध नाही. त्यामुळे विनाकारण शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांच्या तपासात जे काही समोर येईल त्याच्यावरती योग्य ती कारवाई पोलिसांनी करावी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *