राज्याच्या विकासात MIDC चे मोठे योगदान

0
IMG-20220801-WA0105

राज्याच्या विकासात MIDC चे मोठे योगदान…

मुंबई, दि. 2 ऑगस्ट ;
देशात राज्यांचा क्रमांक एक राखण्यात आणि राज्याच्या औद्योगिक विकासात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मोठे योगदान असून यापुढे प्रगती पथावर जाण्यासाठी दोन इंजिन आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या हिरक महोत्सवानिमित्ताने बांद्रा येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महामंडळाचे कार्य उल्लेखनीय आहे. आतापर्यंतचे सर्वाधिक भूसंपादन महामंडळाने केले आहे. पायाभूत सुविधा उभ्या केल्या आहेत. तरूणांसाठी रोजगार निर्मिती या महामंडळाच्या माध्यमातून होत आहे. कोविड काळात उद्योग बंद होऊ न देता काम सुरू राहीले. याचाही मुख्यमंत्र्यांनी उल्लेख केला.

राज्यात मोठ्या प्रमाणात विकासाची कामं होत आहेत. समृद्धी महामार्ग, ट्रान्सहार्बर लिंक या मुळे दळणवळण सोपे होणार आहे. पर्यायाने राज्यातील व्यवसायात वाढ होणार आहे. प्रधान मंत्री यांनी राज्याला सहकार्य करण्याचे आश्वासन दिलेले आहे. तेव्हा सगळ्यांच्या सहकार्याने औद्योगिक क्षेत्रात पुढे जाता येणार आहे. असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

राज्याला एक ट्रिलीयन डाॅलर अर्थव्यवस्थेकडे नेण्यात महामंडळाचे मोठे योगदान आहे. राज्यात असलेली पायाभूत सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर आणि मोठ्या प्रमाणात येत असलेली गुंतवणुक  यामाध्यमातून हे साध्य करता येणार आहे. कोणत्याही राज्याच्या दहा वर्ष पुढे जाण्याची क्षमता आपल्या राज्याची आहे. स्टार्टअप क्षेत्रात राज्यात सर्वाधिक उद्योग आहेत, युनिकाॅर्न कंपन्या राज्यात आहेत. सेवा, उद्योग , सह कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर यामुळे राज्य सर्व उद्योग क्षेत्रात आपला प्रथम क्रमांक राखणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री यांनी व्यक्त केला. येणारा काळ हा स्पर्धेचा आहे, इतर राज्यांनी आपली क्षमता वाढविण्यास सुरूवात केली आहे, तेव्हा गाफील राहून चालणार नाही असा इशाराही श्री फडणवीस यांनी दिला.

विभागाच्या पुढील वाटचालीबद्दल डाॅ. हर्षदीप कांबळे यांनी माहीती दिली तर प्रस्ताविक डाॅ. पी अनबलगन यांनी केले. यावेळी बलदेव सिंग यांनी शुभेच्छा दिल्या. उद्योग विभागाचे माजी अपरमुख्य सचिव बलदेव सिंग, प्रधान सचिव तथा उद्योग आयुक्त डाॅ. हर्षदीप कांबळे ,एम आय डी सी चे मुख्य कार्यकारीअधीकारी डाॅ. पी अनबलगन , सहमुख्य कार्यकारी अधीकारी रंगानाईक,  पी. डी मलिकनेर, उपस्थित होते. यावेळी विकास दर्पण या माहिती पुस्तकाने प्रकाशन करण्यात आले तर, चर्नी रोड येथे प्रस्तावीत असलेले महामंडळाचे कार्यालय कसे असेल याबाबत ध्वनीचित्रफीतीच्या माध्यमातून सादरीकरण केरण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *