संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

0
Raut ED

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी..

मुंबई, दि. १ ऑगस्ट:

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी अटक केल्यानंतर संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. संजय राऊत यांना आठ दिवसांची कोठडी देण्याची मागणी ईडीने केली होती. मात्र सुनावणीनंतर कोर्टाने ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे.

रविवारी सकाळीच ईडीचे पथक संजय राऊत यांच्या घरी धडकले होते. ९ तासाच्या चौकशीनंतर राऊत यांनी ईडी कार्यालयात नेण्यात आले व तेथे सुमारे ७ तास चौकशी केल्यानंतर रात्री उशिरा त्यांना अटक करण्यात आली. सकाळी राऊत यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. ईडीने संजय राऊत यांची ८ दिवसांची कोठडी मागितली होती. राऊत यांच्यावर झालेला कारवाई राजकीय सुडापोटी करण्यात आल्याचा आरोपही राऊतांच्या वकिलांकडून करण्यात आला. ‘आर्थिक गुन्हे शाखेने २०२० मध्ये पत्रा चाळ प्रकरणाचा तपास सुरू केला परंतु प्रवीण राऊत यांच्या विरोधात गेल्या वर्षी ईसीआयआर नोंदवण्यात आला आणि त्यांना यावर्षी जानेवारीमध्ये अटक करण्यात आली. असे असतानाही संजय राऊतांना आतापर्यंत अटक करण्यात आली नव्हती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे निदर्शनास आणून दिले.

संजय राऊतांना औषधे आणि घरचे जेवण देण्यास आपला विरोध नसल्याचे ईडीने स्पष्ट केले. रात्रीच्या वेळी चौकशी केली जाऊ नये अशी विनंती करण्यात आली होती यावर सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान संजय राऊत वकिलांशी सल्लासमलत करु शकतात व रात्री १०.३० नंतर त्यांची चौकशी न करण्याची हमी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *