येवल्यातील गुन्हेगारीला त्वरित पायबंद घाला

0
IMG-20220723-WA0051

येवल्यातील गुन्हेगारीला त्वरित पायबंद घाला….

येवला, दि. 24 जुलै :-

शहरातील व तालुक्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवा, वारंवार घटना घडतात तेथे सीसीटीव्ही बसवा, बंद सीसीटीव्ही चालू करून घ्या, ग्रामरक्षक दले ऍक्टिव्ह करा, पेट्रोलिंग वाढवा, शेजारील तालुक्यातील पोलिसांशी समन्वय ठेवावा, गुन्हेगारी वाढत असल्याने अवैध धंद्यांवर कार्यवाही करून तात्काळ बंद करण्याच्या सूचना छगन भुजबळ यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

येवला शहर व तालुक्यात घरफोड्या, लुटमार यासह गुन्हेगारी अधिक वाढल्याने छगन भुजबळ यांनी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी शहर व तालुक्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी, उपअधीक्षक समीरसिंग साळवे, तालुका निरीक्षक अनिल भवारी, शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *