नरेंद्र मोदींची मध्यमवर्गाला मोठी भेट !

0
PM HEALT 123

‘आयुष्यमान भारत’योजनेत मध्यमवर्गाचा सहभाग

पाच लाख रुपयांचा विमा कव्हर मोफत.

नवी दिल्ली, १४ ऑगस्ट

नरेंद्र मोदी सरकारने मध्यमवर्गाला मोठी भेट दिली आहे. सरकारी आरोग्य विमा योजना ‘आयुष्यमान भारत’ची व्याप्ती वाढवत या योजनेत आता मध्यमवर्गाचाही समावेश करण्यात आला आहे. आजपर्यंत दारिद्र्य रेषेखालील, गरीब लोकांना या आरोग्य योजनेचा लाभ मिळत होता. परंतु या योजनेची व्याप्ती वाढवल्याने मध्यमवर्गाला सुद्धा ५ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे.

आरोग्य विमा योजनांची व्याप्ती वाढवताना केंद्र सरकारने आयुष्मान भारत पंतप्रधान जनआरोग्य योजनेअंतर्गत (AB PM-JAY) सर्व आरोग्य वीमा योजनांना एकत्र करण्याचा निर्णयही घेतला आहे. ही योजना देशभरात लागू करणारी नॅशनल हेल्थ अथॉरिटीने यासाठी परवानगी दिली आहे.

5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत

आयुष्मान भारत योजनेचा लाभ सध्या देशातील १०.७४  कोटी कुटुंबातील ५३ कोटी लोक घेत आहेत. या योजनेअंतर्गत रुग्णालयातील ५ लाखांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात.

या योजनेच्या व्याप्ती वाढवल्याने सर्वाधिक फायदा असंघटीत क्षेत्रात काम करणारे, स्वयंरोजगार करणारे, लघु, छोटे व मध्यम उद्योगात काम करणारे तसेच कोणत्याही विमा योजनेपासून दूर असलेल्यांना देखील फायदा होईल. या योजनेत ज्या खाजगी व सरकारी हॉस्पिटल्सचा समावेश आहे त्यातील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये उपचार घेता येतात.

आयुष्यमान भारत योजना किंवा प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र सरकारची आरोग्य योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना वैद्यकीय उपचार पुरवणे हा आहे. या योजनेअंतर्गत ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत केले जातात. या योजनेत अजून जे लोक सहभागी होऊ शकलेले नाहीत त्यांनाही या योजनेचा लाभ कसा देता येईल यावरही सरकार विचार करत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *