इतिहास विरोध करनेवालों का लिखा जाता है, तलवे चाटनेवालों का नही’!
इतिहास विरोध करनेवालों का लिखा जाता है, तलवे चाटनेवालों का नही’!
मुंबई, दि. १२ जुलै ;
ओबीसी आरक्षणासंदर्भात आकडेवारीची नोंदणी करताना आडनावावरून नोंदणी करु नका असे सांगितले तरी तेच केले गेले. ठाण्यात दहा टक्के ओबीसी दाखवले आहेत. ओबीसी ५४ टक्के आहेत. त्यामुळे जातीय जनगणना करा. निवडणूकीसाठी आपल्याला तयार रहावे लागणार आहे यावरच पुढच्या विधानसभा व विधानपरिषदेच्या निवडणूका आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना भुजबळ म्हणाले की, आता आपण विरोधात आहोत. त्यामुळे जे चुकीचे आहे त्याविरोधात आपण ठामपणे उभे राहायला हवे. ‘गलत का विरोध खुलकर किजीए, राजनीती हो या समाजनीती, इतिहास विरोध करनेवालों का लिखा जाता है तलवे चाटनेवालों का नही’ असाही शायरीतून छगन भुजबळ यांनी इरादा स्पष्ट केला.
बाहेर काय पाऊस..काय वारा पण सगळे आले बघा.. ओकेमध्ये आहे अशी भाषणाची सुरुवात करत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.
ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. कोर्टाचा निकाल आपल्या बाजूने लागेल असा विश्वास छगन भुजबळ यांनी व्यक्त केला. निवडणूका असो नसो आपल्या पक्षाच्या बैठका या होतच असतात. विरोधी पक्षात असताना लोकांनी शरद पवारांना जास्त प्रेम दिले आहे. सत्तेत असतानाही दिले आहे. आता जे काही १०५ असल्याचे बोलत आहेत त्यात आपल्या पक्षातून गेलेले ५० आहेत हे लक्षात ठेवा, असे सूचक विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं.
