शिवसेनेकडेच ‘धनुष्य बाण’ राहणार?

0
20220427_204010

शिवसेनेकडेच ‘धनुष्य बाण’ राहणार?

मुंबई, दि. ८ जुलै :
‘धनुष्य बाण’ हे निवडणूक चिन्ह शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. शिवसेना विधीमंडळ पक्ष हा वेगळा असतो आणि रस्त्यावर संघर्ष करणारा पक्ष वेगळा आहे. त्यामुळे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

मातोश्रीवर झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या चिन्हाबद्दल चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे ‘धनुष्य बाण’ कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, हे मी ठामपणे सांगत आहे. आम्ही घटनातज्ज्ञ, कायदेतज्ज्ञांशी चर्चा केली आहे. शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबत शिवसैनिकांमध्ये, सामान्य जनतेत संभ्रम तयार केला जात आहे. त्याकडे दुर्लक्ष करा. सुप्रीम कोर्टात ११ जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीत शिवसेनेच्या बाजूने निकाल येईल. एखाद दुसरा आमदार निघून गेल्यावर पक्ष संपत नसतो.

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या धुनष्यबाण या चिन्हासाठी ठाकरे व शिंदे या दोन्ही गटांमध्ये न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण व शिवसेना हे आपलेच अलसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. यावर आज झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *