करोडो रुपयांचा निधी देऊनही BMC च्या शाळा बकालच !!
करोडो रुपयांचा निधी देऊनही BMC च्या शाळा बकालच !!
मुंबई, दि. ५ जुलै :
पावसाळ्यापूर्वी बीएमसीने २६९ खाजगी शाळांची यादी प्रसिद्ध केली होती. ज्यांना शाळा चालवण्याचा परवाना नाही अश्या शाळांमधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास सांगितले होते. अशा वेळी विद्यार्थ्यांनी कोणत्या शाळेत जायचे याचे पालिकेने स्पष्टीकरण दिले नाही. यातून महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांवर सातत्याने होत असलेली क्रूरता दिसून येते अशी टीका आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रीती शर्मा मेनन यांनी उपस्थित केला.
मुंबईमध्ये अनेक परवानगी नसलेल्या शाळा आहेत. शाळांची यादी मुंबई महानगरपालिका दरवर्षी प्रसिद्ध करते. मुंबई महानगरपालिका शाळासाठी करोडो रुपये निधी दिला जातो परंतु शाळांची अवस्था बकाल असते यातून विद्यार्थ्यांवर सातत्याने होत असलेली क्रूरता दिसून येते याविषया संदर्भातील महत्वाची पत्रकार परिषद मुंबई पत्रकार संघात आयोजीत करण्यात आली होती. यावर बोलताना प्रीती शर्मा मेनन म्हणाल्या की, पावसाळ्यापूर्वी बीएमसीने २६९ खाजगी शाळांची यादी प्रसिद्ध केली होती. या यादीची तपासणी करताना आम आदमी पार्टीला या शाळांची दुरवस्था झाल्याचे आढळून आले आणि अनेक शाळा संरचनात्मकदृष्ट्या नादुरुस्त आहेत. महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे पुनर्वसन किंवा आरटीई कायद्यांतर्गत उल्लंघन करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने कोणतेही प्रयत्न केले नाहीत. यासोबतच आम आदमी पार्टीचे नेते अस्लम मर्चंट यांनीही मदनपुरा येथील बीएमसी शाळेसाठी तब्बल ७ कोटी मंजूर करूनही शाळेची अवस्था बकाल आहे. तरी देखील मुलांना त्या शाळेत शिकवले जात होते ही दु्दैवी बाब असल्याची खंत प्रिती शर्मा मेनन यांनी व्यक्त केली.
पुढे बोलतांना मेनन म्हणाल्या की, नगरसेवक रईस शेख यांनी मदनपुरा येथील महापालिकेच्या शाळेसाठी ७ कोटींचा निधी दिला गेला. असे असतानाही शाळेमध्ये पायाभूत सुविधांची दुरवस्था झाली आहे आणि मंजूर कामाची अंमलबजावणी करण्यात अपयश आले आहे. योग्यरित्या हे स्पष्ट आहे की,एकीकडे खाजगी शाळांकडे बीएमसी लक्ष देत नाही, तर दुस-या बाबतीत महापालिका शाळांच्या स्थानिक निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप मनेन यांनी केला.
महानगरपालिकेने २०२० आणि २०२२ साठी सामायिक केलेल्या यादीचा अभ्यास केला आहे आणि अशा ४ शाळांना भेट दिली आहे, आम्हाला जे आढळले ते धक्कादायक आहे. शाळांमध्ये स्वच्छतागृहे नाहीत, आग किंवा चेंगराचेंगरीच्या घटनांमध्ये कोणतीही सुरक्षा सुविधा नाही. शून्य वायुवीजन असल्यामुळे उन्हाळ्यात वर्गखोल्यांना हरितगृह बनवते आणि पावसाळ्यात टिनचे छत पावसाचा आवाज असह्य करते. इतकेच नाही तर अधिक तपशीलात न जाता महापालिका नियमांनुसार ही बांधकामे बेकायदेशीर आहेत, असे आम आदमी पार्टीचे मुंबईचे नेते गोपाल झवेरी म्हणाले.
“मेघराज सेठी मार्ग एमपीएस स्कूल मदनपुरा भायखळ्यासाठी ७ कोटींचा निधी मंजूर असतानाही तेथील काम दयनीय आहे, हे धक्कादायक आहे. स्वच्छतागृहे दुरुस्त केलेली नाहीत, भिंतींना तडे गेले आहेत, छताला पावसाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी साचले आहे आणि तेथे कचरा आहे शाळांमधील भंगार भरून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आल्याचे आम आदमी पार्टी मुंबईचे नेते असलम मर्चंट यांनी सांगितले.
