शिंदे-फडणवीस सरकारने पहिली लढाई तर जिंकली !

0
narvekar s

शिंदे-फडणवीस सरकारने पहिली लढाई तर जिंकली !

मुंबई, दि. ३ जुलै :

राज्यातील १३ दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस सरकारने पहिली लढाई जिंकली आहे. विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात विधानसभा अध्यक्षांच्या निवडणुकीत नवीन सरकारचे राहुल नार्वेकर यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजपाच्या राहुल नार्वेकर यांना १६४ तर शिवसेनेचे राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. मनसेने भाजपा उमेदवाराला मतदान केले. समाजवादी पार्टी व एमआयएम तटस्थ राहिले.

भाजपाने पहिली लढाई जिंकली असून सोमवारी विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे. सरकार स्थापन केल्यावर लगेचच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एकनाथ शिंदे यांना बहुमत सिद्ध करण्याचा आदेश दिला होता. या मतदानावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सहाजण गैरहजर राहिले. यामध्ये माजी मंत्री नवाब मलिक आणि अनिल देशमुख जेलमध्ये असल्याने ते मतदानाला उपस्थित राहिले नाहीत. माजी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या आईचे निधन झाल्याने ते सभागृहात येऊ शकले नाहीत. पारनेरचे आमदार निलेश लंके आजारी असल्याचे समजते. माढ्याचे बबनदादा शिंदे, खेडचे दिलीप मोहिते, पिंपरीचे अण्णा बनसोडेही मतदानासाठी अनुपस्थित राहिले. एमआयएमचे मुफ्ती इस्माईलही अनुपस्थित राहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *