कुर्ला इमारत दुर्घटनेतील जीवित हानीला मुंबई महापालिकाच जबाबदार

0
20220629_115441

कुर्ला इमारत दुर्घटनेतील जीवित हानीला मुंबई महापालिकाच जबाबदार….

मुंबई, दि. 29 जुन :
कुर्ला नाईक नगर परिसरातील ४ मजली इमारत कोसळली असून दुर्घटनेत १७ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला, याला सर्वस्व मुंबई महानगरपालिका मध्ये सतेत असणारी शिवसेना आणि संबंधित अधिकारी जबाबदार असल्याची टीका आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या प्रीती शर्मा मेनन यांनी केली.

मुंबईत पावसाळा सुरू झाला की दरवर्षी इमारत कोसळण्याच्या दुर्घटना घडतात, यंदाचा पावसाळा सुरू होताच कुर्ल्यातील ४ मजली इमारत कोसळली या घटनेची माहिती मिळताच आप मुंबईचे महासचिव सुरेशजी व कार्यकर्ते घटनास्थळी पोहचले. जुन्या व धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मुंबईतील कुर्ला नाईक नगर परीसरात दिनांक २७ जुन,२०२२ रोजी सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास ४ मजली इमारत कोसळली. व या दुर्घटनेमध्ये १७ निष्पाप नागरिकांना जीव गमावावा लागला. अकार्यक्षम महानगरपालिकेवर निंदा करत प्रीती शर्मा मेनन यांनी म्हटले आहे की, इमारत कोसळणे ही वार्षिक शोकांतिका बनली असून ज्याची जबाबदारी घ्यायला पालिका नकार देत आहे. २०१८  पासून आजपर्यंत इमारती आणि घरे कोसळण्याच्या सुमारे २००० घटना घडल्या आहेत. या  घटनांमध्ये १०० हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. इतकी भीषण संख्या असूनही मुंबई महानगरपालिका दरवर्षी धोकादायक इमारतींना नोटिसा बजावून मुंबईकरांप्रती आपली जबाबदारी सोडून देण्याचे ठरवते. या चारही इमारतींना मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस दिली होती असे बोलून महानगरपालिका पळ काढत असून नोटीस आल्यावर रहिवाशांनी जायचे कुठे ‘जबरदस्तीच्या सुट्टीवर’ ही दुर्दैवी बाब आहे, खंत त्यावेळी प्रीती शर्मा मेनन यांनी व्यक्त केली.

कुर्ला इमारत कोसळणे, ही एक भयंकर आठवण आहे. आपण मुंबईकर अक्षरशः एका दुर्घटनेतून दुसर्‍या दुर्घटनेत जगत आहोत. दर पावसाळ्यात जीर्ण इमारती कोसळणे हे अक्षरशः रूढ झाले आहे. शिवसेना राज्य करण्यास अयोग्य असल्याचे चित्र वारंवार समोर येते. किंबहुना सध्याचा राजकीय वर्ग एकत्रितपणे मुंबईला अपयशी ठरला आहे, अशी टिका आम आदमी पार्टीचे मुंबई कार्याध्यक्ष रूबेन मस्करेन्हास  यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *