तन मन लावणारे लोक हवेत, प्राईस टॅग लावलेले नको !

0
aditya 12

तन मन लावणारे लोक हवेत, प्राईस टॅग लावलेले नको !

मुंबई, दि. २५ जून :

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे बंड झालेले असताना हे बंड मोडून काढण्यासाठी पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरसारवेल आहेत. शिवसेनेचे नेत, पदाधिकारी, विभागप्रमुख यांच्याशी संवाद साधून पुनःश्च हरिओम करा असे आवाहन करण्यात आलेले आहे. तर दुसरीकडे युवा नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकेरही मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांनी मुंबई, ठाणे सह राज्यातील शिवसेना नगरसेवकांशा संवाद साधला..

नगरसेवकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की. मला वाटलं मुंबईचे नगरसेवक असतील पण नंतर कळलं महाराष्ट्रातील सर्व नगरसेवक उपस्थित आहेत. जेव्हा फूट पडते तेव्हा उत्साह नसतो पण परवापासून म्हणजे मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं तेव्हापासून लोक रस्त्यावर उतरून शिवसेनेसाठी लढायचं आणि जिंकायचं असं बोलताना दिसले. प्रत्येक महिन्याला सर्वांसोबत बसून सामान्यांचे प्रश्न सोडवत आलो. इतर शहरात नगरपालिका, महानगरपालिका कोविड काळात केलेलं काम संपूर्ण देशाने पाहिले आहे. 50% आमदार गेलेले परत येतील….काहींना जेवायला जायचं सांगून घेऊन गेले. मुख्यमंत्र्यांनी आपल्याला लढाईसाठी तयार राहायला सांगितलं आहे.काही दिवस आधी मुख्यमंत्र्यांनी ही कुरबुर ऐकली तेव्हाच त्यांना बोलावून तुम्हाला हवं तर मुख्यमंत्री करतो असं सांगितलं होतं पण काही राक्षसी महत्वाकांक्षा बाळगणाऱ्यांनी हे केलं. त्यांना आता भाजपमध्ये विलीन झाल्याशिवाय पर्याय नाही. शिवसेनेची भूमिका प्राण जाय पण वचन न जाय अशी आहे.

बंड केलेले तिथून सुटून परत येतील… त्यांना घेऊन पुढे जायचं. नितीन देशमुख परत आले, त्यांनी काय झालं ते सांगितलं. काही रुसवे फुगवे असतील, तर सुरत आसाम मध्ये जाऊन बंड केलं नसतं.  प्रथा आहे त्यानुसार पक्ष प्रमुखांकडे बोलायचं होतं. पुढे लढत जायचं आहे, जिंकत जायचं आहे. आपण का, कोणासाठी लढतोय? ते आपल्याला कळलं.

मागचे दोन्ही बंड आपण पाहिले तेव्हा आपण जिंकलो आहोत. नंतर झालेले बंड दोन वर्षात त्यांचं काय झालं आणि आता ते कुठे आहेत ते आपल्याला ठाऊक आहे. आपलं सरकार आता आलं, आपण कामं करतोय. आपलं कर्तव्य बनतं कामं करणं. शिवसेनेची आपण बांधणी करतोय, प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी काम करायचं, जे सोबत नाहीत ते आपले विरोधक. नगरसेवकांची ही ताकत आहे पण रस्त्यावर उतरलेले शिवसैनिक आपण पाहिले. बंड हे विरोधातून सत्तेत जाण्यासाठी असतात पण हे पहिलं बंड सत्तेतून विरोधात जाण्यासाठी आहे.

आपले मुख्यमंत्री हृदयावर आणि मनावर सत्ता गाजवणारे आहेत. जिथे जिथे गेलो तिथे उद्धव साहेबांचे कौतुक लोक करत होते. राजकीय नाही तर सर्वसामान्य लोक उद्धव साहेबांचे कौतुक करतात ही मोठी गोष्ट आहे. जे जे सर्व्हे झाले, कुठे अभ्यास झाला, त्यात उद्धवसाहेब पहिल्या क्रमांकावर असलेले मुख्यमंत्री आहेत, लोकांची कामं करणारे मुख्यमंत्री आहेत.

मुख्यमंत्र्यांची शस्त्रक्रीया झाली आहे अश्या वेळी बंड केले पण ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं. तन मन लावणारे लोक आपल्याला हवेत, प्राईस टॅग लावलेले नकोत. ईडी, सीबीआय यंत्रणा लावल्या जातात पण शिवसैनिक म्हटल्यावर संघर्ष लढा नवीन आपल्याला नाही. आदित्यजी काही करा पण मविआचं सरकार देशासाठी महत्वाचं आहे असं लोक बोलतात. आपण महाराष्ट्र पुढे न्हेत राहिलो. जर सगळे सोबत असाल तर भगव्या रंगात आपण निवडणूक साजरी करू.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *