‘सिंधुरत्न समृध्दी’ची कामे लवकरच लागणार मार्गी

0
IMG-20220608-WA0066

‘सिंधुरत्न समृध्दी’ची कामे लवकरच लागणार मार्गी :

मुंबई, दि.८ जून :

सिंधुरत्न समृध्दी योजनेतील प्रलंबित कामे लवकरच लागणार मार्गी लावण्यासाठी सर्व यंत्रणांनी तात्काळ कार्यवाही करावी असे निर्देश वने राज्यमंत्री दतात्रय भरणे यांनी दिले. मंत्रालयातील दालनात सिंधुरत्न समृध्द योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात बैठकीत वने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,सिंधुरत्न योजनेतंर्गत मत्स्यव्यवसाय, वने व वनोत्पादन, औषधी वनस्पती या प्रस्तावित कामांबाबत कार्यान्वयीन यंत्रणानी आपल्या कार्यक्षेत्रातील कामे पूर्ण करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी.बांबु संग्राहालय दुरूस्ती,तोंडवली वन उद्यान दुरूस्ती,अंबोली येथील फुलपाखरू उद्यान तसेच या मत्स्यव्यवसाय विभागातंर्गत पिंजरा पध्दतीने मत्स्यव्यवसाय,कोळंबी बीज उत्पादन ही कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात यावीत अशा सूचना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी बैठकीत केल्या.

 

माजी राज्यमंत्री दिपक केसरकर म्हणाले, सिंधुरत्न योजनेतंर्गत मत्स्यव्यवसाय,वने व वनोत्पादन,औषधी वनस्पती विकासासाठी सिंधुरत्न योजनेतील प्रस्तावित कामे तात्काळ पूर्ण करण्यासाठी संबधित विभागांकडून कार्यवाही होणे अत्यंत आवश्यक आहे. राज्यस्तरीय मान्यता घेवून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी माजी राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी बैठकीत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *