‘खेलो इंडिया’त महाराष्ट्राच्या मुलींची कब्बडीत दमदार आगेकूच

0
IMG-20220604-WA0041

‘खेलो इंडिया’त महाराष्ट्राच्या मुलींची कब्बडीत दमदार आगेकूच..

पंचकुला, दि. ४ जून :
महाराष्ट्राच्या मुलींच्या कबड्डी संघाने दुसऱ्या दिवशीही विजयी घोडदौड कायम ठेवली. छत्तीसगडच्या संघावर ६२ विरूद्ध १८ असा ४४ गुणांनी दणदणीत विजय मिळवित दिमाखात पुढची फेरी गाठली. या सामन्यात महाराष्ट्राने छत्तीसगडवर तब्बल पाच लोण चढवले.

ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्सचे कबड्डी मैदान आजही महाराष्ट्राने गाजवले. ऋतुजा अवघडी, यशिका पुजारी आणि हरजीतकौर संधूने आजही धडाकेबाज खेळ केला. पहिल्या तीन मिनिटांत महाराष्ट्राच्या मुलींनी छत्तीसगडच्या संघाचा अंदाज घेतला. त्यानंतर आक्रमण सुरू केले. उत्कृष्ट पकडी आणि चढाई केल्याने गुणांची मोठी आघाडी घेता आली. पहिल्या हापमध्ये दोन आणि दुसऱ्या हापमध्ये तीन असे पाच लोण महाराष्ट्राने छत्तीसगडवर चढवले.

प्रत्येक चढाईत छत्तीसगडचे गडी बाद केले जात होते. पकडीही तितक्याच कौशल्याने होत होत्या. शेवटची दहा मिनिटे उरली असताना गुणफलक होता ४१ विरूद्ध १४. महाराष्ट्राने सुरूवातीपासून सामन्यावर मजबूत पकड ठेवली होती. परिणामी हा सामना एकतर्फी झाला. संघाने आज चढाईत सर्वाधिक गुण मिळवले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *