अहिल्यादेवी यांचे सुधारणावादी विचार आजही मार्गदर्शक
अहिल्यादेवी यांचे सुधारणावादी विचार आजही मार्गदर्शक..
मुंबई, दि. ३१ मे :
अहिल्यादेवी होळकर यांचे विचार आजही मार्गदर्शक आहेत, आजही त्यांचे विचार त्यांची कार्यपद्धती आम्हाला प्रेरणा देते असे मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज शासकीय निवस्थान रामटेक येथे अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्हार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार पंकज भुजबळ, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे मुंबई अध्यक्ष सदानंद मंडलिक उपस्थित होते.
प्रजाहितदक्ष, दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण, सुधारणावादी, कर्तव्यतत्पर राज्यकर्ती म्हणून ज्यांचा लौकिक भारतातच नव्हे; तर परदेशातही पसरलेला आहे अश्या रणरागिणी कर्मयोगिनी अहिल्याबाई होळकर होत्या. अहिल्याबाईंनी महिलांसाठीही मोठे कार्य केले होते. त्यांचा राज्यकारभार हा वंचितांसाठी होता त्यामुळे त्यांनी आखून दिलेला राज्यकारभार आजही आम्हाला मार्गदर्शक आहे अश्या भावना देखील मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या…..
