मुंबईत दरड कोसळण्याची सत्ताधारी शिवसेना वाट बघत आहे का?

0
IMG-20220529-WA0027

मुंबईत दरड कोसळण्याची सत्ताधारी शिवसेना वाट बघत आहे का?

मुंबई, दि. 29 मे :

मुंबई महानगरपालिका २५००० कुटुंबांचे पुनर्वसन का करू शकत नाही आणि या डोंगरांना वेढा का घालू शकत नाही? भ्रष्टाचार आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे दर पावसाळ्यात अनेक नागरिकांचे नाहक बळी जातात. आदित्य ठाकरे निधी वाटपाचे श्रेय घेतात आणि या कामांवर कथितपणे देखरेख करतात, मग आपत्तींचे श्रेय देखील त्यांच्याकडेच आहे.  नागरिकाच्या मृत्यूचे रक्त सत्ताधारी शिवसेनेच्या हातावर असून त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी केली.

मुंबईतील अनेक डोंगराळ भागात नागरिकांची पावसाळ्याच्या दिवसात मृत्युची रोजची झुंज असते. येत्या पावसाळ्यात मुंबईत दरड कोसळण्याची घटना घडण्याची सत्ताधारी शिवसेना वाट बघत आहे का? असा प्रश्न आम आदमीच्या नेत्यांनी विचारला आहे.

मुंबई हे टेकड्यांचे शहर असून पूर्वीच्या स्थायिकांनी निवास करण्याच्या उद्देशांने काही टेकड्या काळजीपूर्वक विकसित केल्या आहेत. लोकसंख्येच्या स्फोटामुळे झोपडपट्ट्यांचे अतिक्रमण कोणत्याही सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता टेकड्यांवर वसलेले आहेत. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी सादर केलेल्या २०२१ च्या महितीच्या अधिकाराअंतर्गत मिळवलेल्या माहितीनुसार ३२७ दरड प्रवणक्षेत्र असून २२,४८३ कुटुंबांना पावसाळ्यात धोका असतो.  यावर मुंबई महानगर पालिका दावा करत आहे की, २९१ दरडप्रवण क्षेत्रे आहेत. मुंबई महानगर पालिका आपली चूक झाकण्याकरिता खोटी आकडेवारी जारी करत आहे. २०२१  मध्ये चेंबूरमधील भारत नगर आणि विक्रोळीतील सूर्यानगर येथे दरड कोसळण्याची घटनेत  ३०  हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या पूरप्रवण क्षेत्रांना सुरक्षित करण्यासाठी ६१.४८ कोटी रुपयांचा निधी दिला होता. परंतु दुर्दैवाने या लोकांच्या सुरक्षेसाठी काहीही झाले नाही. कारण ते सर्वात गरीब आहेत आणि मुंबईत गरिबांच्या जीवाची किंमत नाही असा आरोप आम आदमीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला.

गेल्या काही दिवसांत, आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकत्यांनी मुंबईतील काही दरडप्रवण क्षेत्रांना भेट दिली. त्यात सत्य परिस्थिती हि दिसली की, पावसात दरडप्रवण क्षेत्रात घडणाऱ्या घटना थांबण्याकरिता कोणतीही उपययोजना मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आलेली नाही आहे.

आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत चेंबूर येथील आंबेडकर नगरला भेट दिली. ज्या कुटुंबांची घरे पूर्णपणे तुटलेली आहेत त्यांना तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. परंतु उर्वरित कुटुंबांना तेथे धोका असल्याचे निदर्शनात आले. तसेच भिंत बांधण्याचे किंवा ढिगारा हलविण्याचेही काम झालेले नाही.

आम आदमी पार्टी नेते पायस वर्गीस यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसोबत विक्रोळी येथील सूर्यनगरला भेट दिली. गेल्या वर्षी कोसळलेली अनिश्चित भिंत दयनीयपणे तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. ज्या कुटुंबांची घरे तुटली होती त्यांचे पुनर्वसन झाले नाही तर त्यांना अल्प रक्कम दिली गेली, परिणामी त्यांनी पुन्हा तिथेच राहण्याची जागा भाड्याने घेतली आहे. डेंजर झोनमधील इतर अनेक घरे अजूनही मृत्यूच्या छायेखाली उभी आहेत.

प्रीती शर्मा मेनन यांनी मालाडमधील कुरार गावालाही भेट दिली जिथे २०१९ मध्ये जलाशयाची भिंत कोसळून ३० लोकांचा मृत्यू झाला होता. भिंत पुन्हा बांधली गेली नाही किंवा मलबा साफ केला गेला नाही. ज्या ३० कुटुंबांची घरे उध्वस्त झाली आहेत त्यांना दूरच्या माहुलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. रेड झोनमध्ये असलेल्या उर्वरित ७५ घरांचे पुनर्वसन न झाल्याने वर्षभरापासून ते धरणे धरून बसले आहेत. शेवटच्या दोन पावसात त्यांना काही दिवसांसाठी वारंवार शाळेत हलवले जात होते आणि पुन्हा त्यांना त्या जागी आणून ठेवले जाते.

आम आदमी पार्टी नेते गोपाल झवेरी यांनी असलफाला भेट दिली जिथे एक दशकापूर्वी दरड कोसळून १७  लोकांचा मृत्यू झाला होता. तुटलेल्या घरांचा ढिगारा अद्यापही साफ करण्यात आलेला नाही, तसेच राखीव बांधकामही करण्यात आलेले नाही. शेकडो नवीन अतिक्रमणांमुळे हे क्षेत्र आणखी असुरक्षित बनले असून मोठ्या प्रमाणावर आपत्ती होण्याची प्रतीक्षा आहे. मुंबई महानगरपालिका आपत्ती प्रवण क्षेत्रे रिकामी करण्यासाठी किंवा त्या ठिकाणच्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासाठी काहीही केले नाही. त्यांनी ढिगाराही काढला नाही किंवा कोणतीही राखीव संरचना बांधली नाही.

आम आदमी पक्ष दरडप्रवण क्षेत्रांना भेट देत असल्याचे मुंबई महानगरपालिकेला कळले, तेव्हा त्यांनी गुरूवारी लगेचच दरडप्रवण भागातील सर्व रहिवाशांना घरे रिकामी करण्यास सांगितले. आम आदमी पार्टीने मुंबई महानगरपालिकेने दुर्लक्षीत केलेल्या ठिकाणी भेट दिली नव्हती. पक्षाच्या दौऱ्यांची माहिती मिळाल्यानंतरच त्यांनी रहिवाशांना जाण्यास सांगितले. मात्र, या गरीब रहिवाशांनी जायचे कुठे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यांना नक्कीच “सुट्टीवर” जाणे किंवा हॉटेलमध्ये राहणे परवडणारे नाही. त्यांनी त्यांच्या झोपडपट्ट्या त्यांच्या कामाच्या ठिकाणापासून आणि त्यांच्या मुलांच्या शाळा सोडून इतर ठिकाणी जाण्याची अपेक्षा केली जाते. हा मुंबई महानगरपालिकेचा क्रूरपणा असून सत्ताधारी शिवसेना देखील आम आदमी पार्टी निषेध करत आहे.

मुंबई महानगरपालिका दावा करत आहे कि, एनडीआरएफ टीम तैनात करण्यात येणार आहे. परंतु ही टीम फक्त रहिवाशांना त्यांच्या घरांमध्ये पूर आल्यावर हलवतात, ते ही काही दिवसांसाठी. त्यांना सहसा अशा शाळेत ठेवले जाते जिथे जेवणाची सोय नसते. या अनियंत्रित हालचालीमुळे त्यांचे जीवनमान उद्ध्वस्त होते असून तरुणांच्या शिक्षणात अडथळा येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *