चंद्रकांत पाटील यांना राज्य महिला आयोगाची नोटीस
चंद्रकांत पाटील यांना राज्य महिला आयोगाची नोटीस..
मुंबई, दि. २८ मे:
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेले वक्तव्यामुळे ते वादत सापडले. त्यांनी केलेल्या वक्तव्याबाबत दोन दिवसात लेखी खुलासा करावा असे निर्देश राज्य महिला आयोगाने दिले आहेत.
महिला स्वकर्तुत्वावर शिक्षण, व्यवसाय, समाजकारण व राजकारणासह सर्व क्षेत्रात अग्रेसर आहेत. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य समस्थ महिला वर्गाच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचविणारे आहे. एका लोकप्रतिनिधीकडून असे वक्तव्य होणे ही खेदाची बाब आहे. यापुढे महिलांचा सन्मान राखला जाईल याचे भान चंद्रकांत पाटील यांनी राखावे असे म्हणत खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी भाजपाच्या ओबीसी मोर्चादरम्यान खासदार सुप्रीया सुळे यांच्याबाबत बोलताना, दिल्लीला जा नाहीतर मसणात जा……नाहीतर खरी बसा व स्वयंपाक करा, असे आक्षेपार्ह वक्तव्य केले होते त्याबाबत महाराष्ट्र राज्य महिला आयोगास तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे.
