तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही

0
FB_IMG_1652638372385

तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही.

मुंबई, दि. १५ मे :
संभाजी राजांची निर्घृण हत्या करणाऱ्या औरंगजेबच्या समाधीवर असदुद्दीन औवेसी जातो आणि माथा टेकतो. अरे औवेसी ऐकून घे, औरंगजेबच्या समाधीवर कुत्राही लघुशंका करणार नाही, आता पूर्ण हिंदुस्तानात भगवा फडकणार असा घणाघात करत हाच फडणवीस तुमच्या सत्तेचा बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय राहणार नाही’ असा इशारा राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित हिंदी भाषिक संमेलनात देवेंद्र फडणवीस बोलत होते. गोरेगाव येथील नेस्को मैदानावर जंगी सभा पार पडली.

फडणवीस म्हणाले, मला एक प्रश्न विचारायचा आहे, उत्तर द्या. मुंबईत कोरोना काळात भ्रष्टाचार झाला की नाही ? दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला की नाही ? पालघरमध्ये साधूंची हत्या झाली की नाही ? वसूलीच्या आड आलेल्या मन्सुख हिरेन यांची हत्या झाली की नाही ? १०० कोटींच्या वसुली प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये गेले की नाही ? दाऊदचा मित्र जेलमध्ये असूनही मंत्रिमंडळात आहे की नाही ? आमच्या मजूर भावांना अनवाणी मुंबई सोडावी लागली की, नाही ? मुंबई मेट्रो, रस्त्याचं काम बंद आहे की नाही ? यशवंत जाधवची संपत्ती ३५ पासून ५३ झाली की नाही ? असा सवालही फडणवीसांनी केला. आता मला सांगा एवढ्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतरही यापैकी एका गोष्टीवरही आपले मुख्यमंत्री बोलले का ?

आपले मुख्यमंत्री राज्याचे आणि देशातील पहिले मुख्यमंत्री असतील, की अडीच वर्षांमध्ये या महाशयांनी एकही भाषण राज्याच्या विकासावर दिलं नाही, राज्याच्या विषयावर, लोकांच्या समस्येवर दिलं नाही असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं.

आताच आपण हनुमान चालीसा पठण केली. हनुमान चालीसा तर आमच्या हृदयात असते. हनुमान चालीसेच्या दोन ओळी उद्धव ठाकरे आणि या सरकारला अगोदरपासूनच माहीत आहेत आणि केवळ त्या दोन ओळींवरच ते काम करत आहेत. कोणत्या दोन ओळी, “राम दुआरे तुम रखवारे होत न आज्ञा बिन पैसा रे” ….

यामुळेच यशवंत जाधवांच्या २४ महिन्यात ५३ मालमत्ता तयार झाल्या आणि यशवंत जाधवांनी आपल्या मातोश्रींना ५० लाखांचं घड्याळ देखील दिलं. माझा प्रश्न आहे की, हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी कधी विचार केला असेल का ? की त्यांच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालीसा म्हणणं राजद्रोह असेल आणि औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणं हा राजशिष्टाचार असेल, त्यांनी कधी विचार केला असेल का ?” जे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेत होते त्यांनी तलवार म्यान केली असेल. पण आम्ही आमच्या तलवारी म्यानबंद केलेल्या नाहीत. आम्ही सामना करणार आणि खंबीरपणे करणार. मी, जेव्हा म्हणालो रामजन्मभूमीच्या आंदोलनामध्ये तुमचा एकही नेता नव्हता तर किती मिरची लागली ?

अरे “मै तो अयोध्या जा रहा था, बाबरी मस्जिद गिरा रहा था, तुझे मिरची लगी तो मै क्या करु ?”

अरे हां, मी, बाबरी पाडण्याकरता गेलो होतो याचा मला अभिमान आहे. उद्धवजी १९९२ साली फेब्रुवारीत मी नगरसेवक झालो. जुलैमध्ये वकील झालो आणि “डिसेंबरमध्ये नगरसेवक ॲडव्होकेट देवेंद्र फडणवीस बाबरी पाडायला गेला होता” असे फडणवीस म्हणाले.

सभेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपाचे मुंबई अध्यक्ष व आमदार मंगलप्रभात लोढा, आमदार आशिष शेलार, आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी, खासदार मनोज कोटक, माजी खासदार किरीट सोमय्या, कृपाशंकर सिंह, नरेंद्र पाटील, आचार्य पवन त्रिपाठी, आर. डी. यादव, ज्ञानमूर्ती शर्मा, संजय उपाध्याय उपस्थित होते. आर. यु. सिंह यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *