अनधिकृत बांधकामप्रकरणी बीएमसी आडनाव पाहून कारवाई करते

0
images (38)

अनधिकृत बांधकामप्रकरणी बीएमसी आडनाव पाहून कारवाई करते

मुंबई, दि. 10 मे :
अनधिकृत बांधकामांच्या कारवाईबाबत मुंबई महानगरपालिका आडनाव पाहून कारवाई करते. हे मुंबईकर बघत आहेत हे लक्षात ठेवा. कारवाई भेंडी बाजार, मुंब्रा, नागपाडा येथे झाली पण काही पक्षांची शाखा कार्यालय दादर आणि प्रभादेवी येथे सुन्न झाली. हे कुठलं हिंदुत्व? हे कुठलं राष्ट्रीयत्व? राणे दिसतात शेख आणि पठाण दिसत नाहीत का? तेसुद्धा अनधिकृत नाहीत असे म्हणायचे का? असा घणाघाती हल्ला भाजपा आ. आशिष शेलार यांनी आहे.

अनधिकृत बांधकामांविरोधात बीएमसी च्या कारवाईवर बोलताना शेलार म्हणाले, जहांगिरपुरी आणि शाहीन बागमध्ये आम्ही बुलडोझर बघितले. हे दिल्ली महापालिकेचे काम आहे. मात्र, गेल्या पंचवीस वर्षात नागपाडा, मोहम्मद अली रोड किंवा बेहरामपाडा इथे  सत्ताधारी शिवसेनेने बुलडोझर कधीच नेला नाही. आडनावावरून कारवाया होतात असा भेद सरकारने करू नये. आडनाव राणे, राणा, राणावत, कंबोज असेल तर महापालिका ॲक्टिव होऊन घर तोडण्याची नोटीस देते. पण गेल्या २५ वर्षांत खान, पठाण, शेख यांनी काय अनधिकृत बांधकाम केले नाही काय? शाहीन बागवर कारवाई केल्यावर तुम्ही कोल्हेकुई करता बेहराम पाडा तुम्हांला दिसत नाही का?

एनआयएने २९ ठिकाणी छापेमारी केली. त्याचे भारतीय जनता पक्षाच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे. दाऊदचे हस्तक, दाऊदशी व्यवहार, डी ट्रस्ट नावावर पैशाची उकळणे आणि त्यातून होणारे टेरर फ़ंडीग समूळ नष्ट करण्यात आले. दाऊद याचा समूळ नायनाट करण्याचा कार्यक्रम मोदी सरकारने केला आहे. मुंबईला आणि मुंबईकरांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे मोठे पाऊल मोदी सरकारने उचलले आहे. आमची अपेक्षा आहे राज्याचे पोलिस एनआयएला दाऊदविरोधी कारवाईत सहकार्य करेल. राज्याचे पोलिस हनुमान भक्तांना पकडायला निघाले आहे. हनुमान चालीसा म्हणणाऱ्याना पकडायला निघाले आहे. आणि केंद्रातले पोलीस दाऊदच्या हस्तकांना पकडायला निघाले आहे. हा फरक राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी सरकारच्या कामकाजातील आहे, असेही शेलार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *