छत्रपती शाहू महाराजांचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजवा !

0
IMG-20220506-WA0080

छत्रपती शाहू महाराजांचे विचार प्रत्येकाच्या मनात रुजवा !

नाशिक, दि.7 मे :
छत्रपती शाहू महाराज हे महात्मा फुलेंच्या विचारांवर  काम करत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मदत केली. त्यामुळे मोठं नेतृत्व देशापुढे आलं. त्यामुळे छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर ही आपली दैवत आहे. आपण त्यांना दैवत का मानतो. हे प्रत्येक घरात तसेच प्रत्येकाच्या मनात पोहचविण्यासाठी त्यांचा इतिहास जनतेपर्यंत पोहचला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रावसाहेब थोरात सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

भुजबळ पुढे म्हणाले की, शाहू महाराजांचा नाशिक शहराचा अत्यंत जवळचा संबंध आहे. वसतिगृहाना त्यांनी अधिक मदत केली. सत्यशोधक चळवळीच्या कामाला त्यांनी अधिक प्रोत्साहन दिले. बहुजन समाजाच्या शिक्षणाच्या कामासाठी पुढे आलेल्या गणपतराव मोरेंसह विविध लोकांच्या मागे ते खंबीरपणे उभे राहिले. त्यांना आधार दिला. आधुनिकतेची कास धरून त्यांनी देशाला पुढे नेण्यासाठी केलेलं योगदान अतिशय मोलाचे आहे.त्यांच्या विचारांचा आदर्श समाजात जाण्यासाठी अशा प्रकारची व्याख्याने नियमित आयोजित करण्यात यावे असे आवाहन करत छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम वर्षभर राबविण्यात येणार आहे.

छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या जीवनावरील पुस्तके व तैलचित्रांचे जिल्ह्यातील सर्व शासकीय वाचनालयाना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने भेट स्वरूपात देण्यात येत आहे. त्यानुसार या प्रसंगी मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात पाच वाचनालयाना पुस्तके व तैलचित्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माजी आमदार जयवंतराव जाधव, अपूर्व हिरे, डॉ.शेफाली भुजबळ, जिल्हाध्यक्ष ऍड.रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, कार्याध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, सचिन पिंगळे,भाऊसाहेब खताळे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, माजी नगरसेवक गजानन शेलार, जगदीश पवार, सुषमा पगारे, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ. योगेश गोसावी, शहराध्यक्ष संतोष सोनपसारे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, गौरव गोवर्धने,निवृत्ती अरिंगळे, संजय खैरनार,कविता कर्डक, शंकर मोकळ,अमर वझरे, डॉ.नागेश गवळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *