राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्याताई चव्हाण

0
ncp

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्याताई चव्हाण..

मुंबई दि. ५ मे :

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी माजी आमदार विद्याताई चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान यांनी ही घोषणा केली.

सध्या राज्यातील जिल्हा कमिट्या तशाच राहणार आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विभागीय अध्यक्षपद पहिल्यांदाच देण्याचा निर्णय झाला आहे. यावेळी नागपूर विभाग अध्यक्षा शाहीन हकीम (गडचिरोली), अमरावती विभाग अध्यक्षा वर्षा निकम (यवतमाळ), मराठवाडा विभाग अध्यक्षा शाजिया शैख (जालना), वैशाली मोटे (उस्मानाबाद), पश्चिम महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता म्हेत्रे (सातारा), वैशाली नागवडे (पुणे), कोकण विभाग अध्यक्षा अर्चना घारे (सिंधुदुर्ग), ठाणे विभाग अध्यक्षा ऋता आव्हाड (ठाणे), उत्तर महाराष्ट्र विभाग अध्यक्षा कविता परदेशी आदींची नियुक्तीही खासदार फौजिया खान यांनी जाहीर केली.

फौजिया खान यांनी विद्याताई यांना नियुक्तीपत्र दिले. विद्याताईं ही नियुक्ती स्विकारत असल्याचे सांगतानाच महागाईसारख्या प्रश्नाकडे दुर्लक्ष झाले आहे. महिला वर्ग त्रासला आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधणार असल्याचे स्पष्ट केले. अनेक महिला पक्षात चांगले काम करत आहेत. मला पक्षाने संधी दिली आहे आणि जो विश्वास टाकला आहे त्या विश्वासाला पात्र ठरेन असे विद्याताई चव्हाण म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *