भाजपने दिलेली स्क्रिप्ट गिरवायची एवढंच राज ठाकरेंना काम !
भाजपने दिलेली स्क्रिप्ट गिरवायची एवढंच राज ठाकरेंना काम !
मुंबई दि. 2 मे :
राज ठाकरेंनी शिक्षणाचा,आरोग्याचा, रोजगाराचा, सामाजिक व धार्मिक एकात्मतेचा अल्टिमेटम दिला असता तर आम्ही सर्वांनी त्यांचे स्वागत केले असते. परंतु भाजपने दिलेली स्क्रिप्टच गिरवायची आता एवढंच काम राज ठाकरेंना राहिले आहे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.
महेश तपासे म्हणाले, स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना कुठल्याच प्रकारचा नवीन सामाजिक व राजकीय विचार राज ठाकरे देऊ शकले नाही म्हणूनच आतापर्यंत राजकारणात त्यांचा पक्ष अपयशी ठरलेला आहे.
पवार पवारांसारख्या कृतिशील नेत्यावर टीका-टिप्पणी केल्याशिवाय आपल्याला प्रसिद्धी मिळत नाही आणि म्हणूनच त्यांच्यावर काही नेते बोलतात. पवारांच्या नखाइतकी उंची जर राज ठाकरेंची असती तर नक्कीच ते एक कर्तुत्ववान नेते म्हणून राज्यामध्ये वावरले असते.
महाराष्ट्रात जातीय व धार्मिक एकात्मता राखण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम आहे आणि म्हणूनच काही लोकांच्या भाषणाकडे कानाडोळा करणे हेच महाराष्ट्राच्या हिताचे आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.
