… तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचे कौतुक करणार नाहीत !

0
NCP MNs

… तोपर्यंत राज ठाकरे महाराष्ट्राचे कौतुक करणार नाहीत !

मुंबई दि. २९ एप्रिल

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कैतुक केल्याने राजकीय चर्चा जोरात सुरु आहे. जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे कौतुक करायचे नाही असे त्यांनी ठरवले असेल तर मग दुसर्‍या राज्याचे कौतुक ते करणारच असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला.

प्रसार माध्यमांशी बोलताना जयंत पाटील म्हणाले,एकदा गुजरातचं कौतुक करुन झालं आता युपीचं कौतुक करतील आणि महाराष्ट्र सोडून सर्व राज्याचं कौतुक करायला दौरे करतील..दुसर्‍या राज्यात जाऊन त्या राज्यांचे कौतुक राज ठाकरे करतच राहणार आहेत.

मुंबईतील हिंदी भाषिक मनसेच्या मागच्या वागण्यामुळे कितीतरी लांब जातील याची भाजपला माहिती आहे त्यामुळे भाजपकडून संघाने केलं म्हणून आम्ही करतोय अशी स्टोरी तयार व्हायला लागलेली दिसते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *