राणा आमदार खासदार दाम्पत्याला हाय कोर्टाचा दणका
राणा आमदार खासदार दाम्पत्याला हाय कोर्टाचा दणका.
मुंबई, दि. २५ एप्रिल
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा व त्यांचे आमदार पती रवी राणा यांना मुंबई हाय कोर्टाने फटकारले असून त्यांची याचिकाही रद्द करण्यात आली आहे. देशद्रोहाच्या गुन्ह्यासंदर्भात कठोर कारवाई करण्याआधी पोलिसांनी राणा यांना ७२ तासांची नोटीस द्यावी एवढाचा दिलासा कोर्टाने दिला आहे.
एकाच प्रकरणात दोन एफआयआर दाखल करण्यावर राणा यांच्या वकीलांनी आक्षेप घेतला होता. मात्र सरकारी वकिलांनी नवनीत राणा यांनी पोलिसांना धक्काबुक्की, शिवीगाळ केली, त्यांनी पोलिसांना सहकार्य न करता त्यांच्या कामात अडथळा आणला म्हणून दुसरा एफआयआर दाखल केल्याचे सांगितले.
राणा दांपत्य जबाबदार पदावर असूनही त्यांनी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवेल होईल अशी स्थिती निर्माण केली. तसंच राणा दांपत्यावरील दोन्ही गुन्हे एकाच घटनेचा भाग असल्याचे न्यायालयाने अमान्य केले. आणि राणा दाम्पत्याची दुसरा गुन्हा रद्द करण्याची मागणी फेटाळली.
सुनावनीवेळी न्यायालयाने म्हटले की, “जबाबदार पदावर असणाऱ्यांनी विशेषकरून लोकप्रतिनिधींनी एकमेकांविषयी आदराने बोलावे आणि वागावे असे आम्ही वारंवार म्हटलं आहे परंतु त्याकडे लोकप्रतिनिधी कानाडोळा करतात. लोकप्रतिनिधींकडून याप्रकरणी काही अपेक्षा करणे चुकीचे आहे.
खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा चंग बांधला होता. त्यासाठी अमरावती येथून ते दोघे मुंबईत खार येथील घरी आले होते.
