FB_IMG_1596987764849

मुंबई, दि.9 ऑगस्ट

कोरोनाचे संकट आल्यापासून एक शब्द मात्र परवलीचा झालाय तो म्हणजे इम्युनिस्टी बुस्टर अर्थात रोगप्रतिकारक शक्ती..यासाठी लोकांनी तर तुफान खरेदी केली. च्यवनप्राश, तुलसी, वेगवेगळे काढे, आयुर्वेदिक,  होमिओपॅथी, अॅलोपॅथी सगळ्यांनी आपले प्राॅडक्ट मोठ्या जाहिराती करत बाजारात माःडलं. लोकांनी विशेषतः शहरात तर यांचा तुफान खप…पण यात एक महत्त्वाचे आहे ते म्हणजे आपल्याकडे असलेल्या रानभाज्या..या रानभाज्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात फारच उपयुक्त ठरतात पण आपल्यापैकी  किती जणांना या भाज्यांची नावंही माहित नाहीत…

चला तर मग पाहुयात या रानभाज्या आहेत तर कोणत्या… सराटा, गुळवेल, बांबूच्या कोवळी पाने, केनपाट, इचका, पिंपळ पान, भुई आवळी, चुका, अंबाडी, चिघळ, शेवगा पाला, उंबर, पाथरी, कडवंची, तांदुळजा, हादगा, आघाडा, अळू, टाकळा, चंदन बटवा, करडई, कुरडू, खापरखुटी, सुरण, चंदनबटवा, काटवल, बांबू आस्ते या व अशा जवळ पास 40_50 वेगवेगळ्या रानभाज्या आहेत. या मुख्यत्वे आदिवासी भागात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. तर यातील मोजक्या भाज्या आपल्या दररोजच्या मंडईत मिळतात.

गुुुळवेल ला मोठी मागणी …..

रानभाज्या पावसाच्या सुरवातीला आढळून येत असून औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असतात. मधुमेह, मूळव्याध, डोकेदुखी, मुतखडा, हृदयविकार, पित्त, श्वसनाचे आजार, मानसिक थकवा, स्थूलपणा, हत्तीरोग, सांधेदुखी, अतिसार, अपचन यासारख्या विविध विकारांसाठी या रानभाज्या खाणे हितकारक आहे.
यातील गुळवेल ला मात्र मोठी मागणी आहे. कारण
गुळवेलमध्ये अँटी ऑक्सिडेंट्स, अँटी इन्फ्लेमेट्री गुणधर्म आहेत. यामध्ये ग्लुकोसाइड, फॉस्फोरस, कॉपर, कॅल्शियम, झिंक आणि मॅग्नेशियम यासारखे खनिजे देखील आहेत. हे घटक आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत मिळते गुळवेलीमुळे रोगप्रतिकारक क्षमता मजबूत होते. गुळवेल ही ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी रामबाण उपाय आहे. डेंग्यूच्या तापामध्ये आपल्याला शरीरातील रक्तपेशी कमी होतात, या समस्येपासून बचाव करण्यासाठीही गुळवेलचे सेवन फायदेशीर ठरते.

या सर्व रानभाज्या खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढून रक्ताभिसरण व्यवस्थित राहते. कोरोना मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी या भाज्यांची आपल्या जेवणात आवश्यकता आहे..

ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात रानभाज्या महोत्सवाचे आयोजन सरकारने केले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *