वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकाने कार्यरत राहावे

0
IMG-20220415-WA0081

वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकाने कार्यरत राहावे.

मुंबई, दि: 18 एप्रिल :

सामाजिक कार्याचा वसा घेऊन आपापल्या क्षेत्रात उतरलेल्या माणसांचा प्रवास सोपा नसतो. त्यांच्या यशोगाथेमागे त्यांचा अविरत संघर्ष असतो. मोठमोठी पदे भूषवितानाच त्यांनी केलेली लोकोपयोगी कामे, त्यांच्या कर्तृत्वाचा उचित सन्मान झाल्यास त्यातून नव्या पिढीलाही प्रेरणा मिळते असे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काढले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्ताने भारतीय जनता पार्टी, मुंबई अनुसूचित जाती मोर्चाच्या माध्यमातून बहुजन समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे करण्यात आला.

समाजाच्या विकासासाठी नागरिकांचे स्वतःचे सामाजिक दायित्व अधिक महत्वाचे आहे. समाजातील अनेकजण संपूर्ण निष्ठेने कार्य करत असतात. त्यातूनच समाजाची जडणघडण होत असते. वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकाने कार्यरत राहावे असे आवाहन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.

यावेळी आय.पी.एस. अधिकारी भावना यादव, नॅशनल पावर लिफ्टिंग स्पर्धेत ३ सुवर्णपदक व १ रौप्यपदक पटकवणारी खेळाडू समीक्षा देवळेकर,“घे भरारी” महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणासाठी प्रयत्न करणाऱ्या स्नेहा भालेराव, आंबेडकरी चळवळीत सक्रिय असलेले शरद कांबळे, रोहिदास समाज पंचायत संघ मुंबई, या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणारे रवि पेवेकर यांना सन्मानित करण्यात आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *