धार्मिक राजकारणामुळे तरुणांमध्ये अस्थिरता !

0
IMG-20220417-WA0057

धार्मिक राजकारणामुळे तरुणांमध्ये अस्थिरता !

पुणे, दि. १७ एप्रिल :

देशात व राज्यात जे धार्मिक राजकारण केले जात आहे, त्यामुळे तरुणांमध्ये एक अस्थिरता आहे. त्यांना फुले – शाहू – आंबेडकर यांच्या मार्गावर चालण्याची दिशा आपल्याला द्यावी लागेल. यासाठी वैचारिक बैठका घ्या असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी वाई येथे

सध्या देशात गोबेल्स निती अवलंबिली जात आहे. खोट्याला खरं ठरवण्याचा खटाटोप सुरू आहे. या गोबेल्स नितीला मारक अशी संघटना आपल्याला तयार करायची आहे. आज पेट्रोल – डिझेल, सिलेंडरचे भाव वाढले आहेत ही खरी गोष्ट लोकांना जावून सांगा असेही मार्गदर्शन जयंत पाटील यांनी केले.

गडचिरोली जिल्ह्यापासून सुरू झालेला हा दौरा २३ तारखेला कोल्हापूरात संपणार आहे. आपली संघटना अधिक मजबूत करण्यासाठी, संघटनेला एक भूमिका देण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर फिरलो आणि आज वाईत पोहोचलो आहे. आपल्या पक्षाची बैठक व्यापक केली पाहिजे. संघटना व्यापक झाली पाहिजे. सर्व समाजातील, सर्व गावातील लोकांना एकत्र करून आपल्या संघटनेत घ्या असे आवाहनही जयंत पाटील यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेची बांधणी करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचीही यात्रा निघाली आहे. शरद पवारांचा विचार शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते काम करत आहे. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करून लोकांच्या मनात घर बनवण्याचे काम आम्ही सर्व करत आहोत.पक्ष वाढवण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जे आदेश देतील, जो कार्यक्रम देईल त्यांची पूर्तता करण्याचे काम आम्ही करू असे आश्वासन आमदार मकरंद पाटील यांनी दिले.

खासदार श्रीनिवास पाटील यावेळी म्हणाले, संवादाने माणसांचे बळ वाढते, समन्वय साधण्यासाठी संवाद साधण्याची गरज असते आणि समन्वयाने आपल्याला ही संघटना वाढवायची आहे म्हणून ही राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आहे. लोकांच्या सुखदुःखात आपण जर सहभागी झालो की लोकं आपोआप आपल्याशी जोडले जातात. हेच काम आपल्याला करायचे आहे. आपली संघटना वाढवण्यासाठी मोठी मदत होईल असेही खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले.

यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार मकरंद पाटील, आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष सुनील माने, पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, आयटी सेलचे प्रमुख सारंग पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, युवक जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, युवती जिल्हाध्यक्षा पुजा काळे, तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे, खंडाळा युवक तालुकाध्यक्ष अजय भोसले, महिला जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव, वाई युवक तालुकाध्यक्ष समाधान कदम, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष बाबुराव सपकाळ, खंडाळा तालुकाध्यक्ष दत्तानाना ढमाळ आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *