सोमय्या कुटुंबाचा १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा !
सोमय्या कुटुंबाचा १०० कोटींचा टॉयलेट घोटाळा !
मुंबई, दि. १५ एप्रिल :
भाजपा व शिवसेना यांच्यातील आरोप प्रत्यारोपाचे राजकारण जोरात सुरु आहे. भाजपाचे नेते किरिट सोमय्या व शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे भ्रष्टाचाराचे दररोज नवीन आरोप करत आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज किरीट सोमय्यांवर तोफ डागत सोमय्या कुटुंबानी १०० कोटींहून अधिकचा घोटाळा केला असल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, मीरा भाईंदर महानगरपालिका आणि महाराष्ट्रात इतर ठिकाणी कोट्यवधींचा टॉयलेट घोटाळा झाला आहे. विक्रांतपासून टॉयलेटपर्यंत यांनी पैसे खाल्ले आहेत. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्रीमती सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबियांनी केलेला हा घोटाळा याला टॉयलेट घोटाळाच म्हणता येईल दुसरा कोणता शब्द मी वापरत नाही. खोटी बिले, पर्यावरणाचा ऱ्हास करुन निर्माण केलेले हे घोटाळे आहेत. पैसे कसे काढले याची माहिती बाहेर येईल. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी बोलायला हवे, त्यांना भ्रष्टाचाराविषयी फार कणव आहे. फडणवीस यांनी शरद पवारांवर ट्विट केले. एखादे ट्विट त्यांनी आयएनस विक्रांत घोटाळ्यावर करायला हवे होते. एखादे ट्विट टॉयलेट घोटाळ्यावर करावे.
किरिट सोमय्या यांनी विक्रांत बचावच्या नावाने पैसे गोळा करून त्याचा अपहार केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. याप्रकरणी सोमय्या अडचणीत आल्याने दोन- तीन दिवस गायब झाले होते परंतु उच्च न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केल्यानंतर ते पुन्हा बाहेर आले आहेत.
