अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा राष्ट्रवादीत

0
NCP 22

अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा राष्ट्रवादीत..

मुंबई, दि. ७ एप्रिल:

मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आसावरी जोशी व स्वागता शहा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पक्षप्रवेश करणार्‍यांचे अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत केले.

अजित पवार म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सुसंस्कृत महाराष्ट्राला पुढे नेण्याचा प्रयत्न केला त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून महाराष्ट्र पुढे नेण्याचे काम शरद पवार करत आहेत. प्रवेश द्यायचा आणि संपर्क ठेवायचा नाही असं होता कामा नये. पक्षाला बाधा निर्माण होईल असे काम करु नका, राज्यातील तीन हजार कलाकारांना राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून मदत दिली आहे. शिवाय तमाशा कलावंतांनाही मदत दिली आहे.

आमदार सुनील शेळकेसारखा उमदा कार्यकर्ता आम्हाला मावळमध्ये भेटला. लोकांनी आपली जबाबदारी पार पाडली आता आमची कामे करण्याची जबाबदारी आहे असेही. समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या संकटात आपण खूप भोगलं आहे आता कुठे सावरण्याचा प्रयत्न महाराष्ट्र करत आहे अशावेळी काही राजकीय पक्ष कोणताही विषय काढून महाराष्ट्र अशांत करण्याचा प्रयत्न करत आहे असेही अजित पवार म्हणाले.

अभिनेत्री आसावरी जोशी, स्वागता शहा यांच्यासह मावळ तालुक्यातील भाजपचे अमोल केदारी, शिवली सरपंच बाळासाहेब आडकर, माजी पंचायत समिती सदस्य दिनकर आडकर, अरुण आडकर, कॉंग्रेसचे प्रवक्ते फिरोज शेख, रायगड सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष नंदू भोपी, कामगार नेते भारत चौधरी, नितळम उपसरपंच भानुदास म्हात्रे, अशोक भोपी, संदीप भोपी, प्रतिक चौधरी, वृषभ चौधरी, ज्ञानदेव म्हात्रे, भिमसेन पाटील, रंजित तांबडे आदींसह असंख्य कार्यकर्त्यांनी जाहीर प्रवेश केला.

आमदार सुनिल शेळके, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *