नाना पटोलेंचे वकील सतिश उकेंवर ईडीची कारवाई
नाना पटोलेंचे वकील सतिश उकेंवर ईडीची कारवाई..
मुंबई, दि. ३१ मार्च:
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करणारे तसेच आयपीएस रश्मी शुक्लांवर ५०० कोटींच्या अब्रुनुकसानभरपाई प्रकरणी नाना पटोले यांचे वकील सतिश उके यांच्या घरावर आज ईडीने धाड टाकली. पहाटे पाच वाजता ही धाड टाकण्यात आली व पाच तासांच्या चौकशीनंतर सतिश उके यांना ईडीने ताब्यात घेतले.
देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ च्या निवडणुक पत्रिज्ञापत्रात दोन गुन्हे लपवल्याच्या विरोधात उकेंनी याचिका दाखल केली होती. जस्टिस लोया मृत्यू प्रकरणीही त्यांनी गंभीर आरोप केले होते. सतिश उके यांच्यावरील ईडीच्या कारवाईवरून राज्यात उलट सुलट चर्चा सुरु आहे.
एका जमीन व्यवहाराप्रकरणी सतिश उके यांच्यावर ईडीने कारवाई केल्याचे सांगितले जात आहे परंतु सतिश उके यांची एकूण भाजपविरोधी प्रतिमा लक्षात घेता ईडीच्या कारवाईवरून चर्चांना सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वकील सतिश उके यांची नागपुरात भेट घेतली.
ईडीने कारवाई करत त्यांचा लॅपटॉप, फाईल्स व मोबाईही जप्त केला आहे. सतिश उके यांना अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
