उद्योजकांनी गेल्या दोन वर्षांचा बॅकलोक भरून काढावा
उद्योजकांनी गेल्या दोन वर्षांचा बॅकलोक भरून काढावा..
नाशिक, दि.१८ मार्च :
उद्योजकांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध असून ते लवकरच सोडविले जातील. नाशिक शहराला चांगलं हवामान लाभलं असून नाशिक हे मुंबई पुण्यासारखे नक्कीच झाले पाहिजे. मात्र इतर शहरात काही चुकीची पाऊले पडली असतील तर त्याचा अभ्यास करून नाशिकमध्ये विकास करण्यात येऊन नाशिकची ओळख टिकविण्यासाठी उद्योजकांनी प्रयत्न करावे असे आवाहन अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले.
मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नाशिक शहारातील डोंगरे वसतिगृह येथे नाशिक ‘आयमा इंडेक्स २०२२’ उदघाटन पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.
छगन भुजबळ म्हणाले की, आयमा इंडेक्सच्या माध्यमातून ८५० कोटी रुपयांची गुंतवणूक पहिल्याच दिवशी झाली आहे. या सर्व उद्योजकांचे स्वागत केले. नाशिकमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करून उद्योगांना आवश्यक असे वातावरण तयार केले. नाशिकमध्ये एचएएलच्या माध्यमातून ओझर येथे विमानतळ विकसित करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून पाहिले उत्कृष्ट असे विमानतळ विकसित करण्यात आले आहे. नाशिकच्या विमानतळावर पार्किंची सुविधा असल्याने याठिकाणी विमाने यावीत अशी मागणी आहे. मात्र पार्किंगसाठी दुसरीकडे पाठविली जात आहे. त्यासाठी आपला प्रयत्न कायम आहे. विमाने रिपेरिंगसाठी नाशिकला प्राधान्य देण्यात आले असून या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन नाशिकच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नाशिकला अतिशय चांगला हवामान लाभलं असून प्रदूषण कारी उद्योग शहराच्या बाहेर विकसित करण्यात यावे जेणेकरून नाशिक शहराचे हवामान टिकेल. मुंबई पुण्यात औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झाले असून याठिकाणी आता महाराष्ट्रात मुंबई पुण्यानंतर आता नाशिक हे उद्योजकांसाठी महत्वाचे डेस्टिनेशन आहे. महाराष्ट्रात अधिक उद्योग यावे यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहे. महाराष्ट्रातील प्रकल्प इतरत्र जाणार नाही यासाठी प्रयत्न सुरू असून महाविकास आघाडी सरकार काम करत कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोनाचा प्रभाव संपला असून शासन विकास कामांचा बॅकलोक भरून काढण्यासाठी प्रयत्न करत असू उद्योजकांनी देखील गेल्या दोन वर्षांचा बॅकलोक भरून काढावा असे आवाहन त्यांनी केले.
