युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाल राऊत

0
20220316_193451

युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कुणाल राऊत…

मुंबई, दि. १६ मार्च :
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत सर्वाधिक ५ लाखांहून अधिक मते घेणाऱ्या कुणाल राऊत यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड घोषित करण्यात आली. अखिल भारतीय युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनी जारी केलेल्या पत्राद्वारे राऊत यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली.

युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी चांगलीच चुरस बघायला मिळाली होती. निवडणुकीत १४ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये, कुणाल राऊत यांनी तब्बल ५ लाखांहून अधिक मते घेऊन बाजी मारली होती. त्यामुळे त्यांच्या नियुक्तीची केवळ औपचारिक घोषणा उरली होती.

कुणाल राऊत यांना निवडणुकीत सर्वाधिक 5,48,267 मते मिळाली होती. त्यांचे प्रतिस्पर्धी शिवराज मोरे यांना 3,80,367 तर शरण बसवराज पाटील यांना 2,46,695 मते मिळाली होती. त्यामुळे राऊत यांच्या नावाची केवळ औपचारिक घोषणा उरली होती.

कुणाल राऊत हे राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पूत्र आहेत. विद्यार्थी दशेतच त्यांनी राजकारण आणि समाजकारण यात रस घेण्यास सुरुवात केली. “संकल्प” या स्वयंसेवी सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्यास प्रारंभ केला. त्यानंतर काँग्रेसच्या एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी संघर्ष सुरू केला. एनएसयुआयचे नागपूर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी 2009 पासून काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते सलग दोनदा निवडणुकीच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून निवडून आले. तसेच 2018 च्या युवक काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुकीत ते युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून निवडून आले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *