१३ हजार कोटींचे घोटाळे; CBI चौकशीला परवानगी का देत नाही ?

0
20210915_223025

१३ हजार कोटींचे घोटाळे; CBI चौकशीला परवानगी का देत नाही ?

मुंबई, दि. 16 मार्च:

राष्ट्रीयकृत बँकांचे विविध कंपन्यांनी सुमारे १३ हजार कोटी रुपये बुडविले असून याप्रकरणी गुन्हे दाखल करुन चौकशी करण्याची परवानगी सीबीआयने राज्य सरकारकडे मागितली आहे. मात्र, ही परवानगी का देत नाही ? असा सवाल भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेत उपस्थित केला.

राष्ट्रीयकृत आणि खाजगी बँकामधून विविध कंपन्यांनी कर्ज घेऊन ते बुडविले. सदर प्रकरणी सीबीआयकडे विविध बँकांनी तक्रारदाखल केल्या असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन चौकशी करण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागत आहे मात्र सरकारने ही परवानगी दिलेली नाही त्यामुळे या चौकश्या होऊ शकत नाही. नागरिकांचा पैसा बुडविणा-या चौकश्यांना सरकार का रोखते आहे असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी करित १२ बँकांची नावे तपशीलासह सादर केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *