‘काश्मीर फाईल्स’च्या माध्यमातून राजकीय अजेंडा !

0
Kfile

‘काश्मीर फाईल्स’च्या माध्यमातून राजकीय अजेंडा !

नवी दिल्ली, दि. १६ मार्च :

द काश्मीर फाईल्स चित्रपटावरून देशभरात राजकारण रंगले आहे. या चित्रपटावरून सरळ सरळ दोन गट पडले असल्याचे दिसत असताना या चित्रपटावरून राजकारणही जोरात सुरु आहे. पंतप्रधान मोदी हे काश्मीर फाईल्सचे सर्वात मोठे प्रचारक असून एक राजकीय अजेंडा राबवला जात आहे असा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत म्हणाले की, काश्मीर फाईलमध्ये अनेक सत्ये दडवली आहेत. ताश्कंद फाईल्स चित्रपटात लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे खापर एका कुटुंबावर फोडण्याचा अजेंडा होता तसाच अजेंडा काश्मीर फाईल्सचा आहे. काश्मीरची खरी फाईल बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे. नुसते सिनेमा टॅक्स फ्री करून त्यांच्या वेदना कळत नाहीत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे कौतक करत सर्वांनी हा सिनेमा पहावा असे आवाहन करत बरीच वर्षे सत्य दडवल्याचा आरोप केला आहे. हा चित्रपट टॅक्स फ्री करावी अशी मागणी भाजपा करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *