IPS रश्मी शुक्लांवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार !
IPS रश्मी शुक्लांवर ५०० कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार !
मुंबई, दि. ६ मार्च
बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणी महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणी वाढत आहेत. फोन टॅपिंग प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला असून त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार असल्याने त्या अटकेपासून वाचण्यासाठी कोर्टाच्या फेऱ्या मारत आहेत. संजय राऊत व एकनाथ खडसे यांच्या फोन टॅपिंगप्रकरणीही रश्मी शुल्कांवर दुसरा गुन्हा दाकल झाला आहे. आता फोन टॅपिंग प्रकरणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुल्कांवर दावा ठोकणार असल्याचे म्हटले आहे.
पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, पुणे पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असताना रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे माझे फोन टॅपिंग केले. अमली पदार्थांच्या व्यापाराशी माझा संबंध लावून अमजद खान असे मुस्लीम नाव ठेवून फोन टॅप करण्यात आले, याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यावेळी मुख्यमंत्री व गृहमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते, त्यांचा सहभाग यामध्ये असेल तर त्यांच्यावरही कारवाई केली जाईल. सध्या मुख्य आरोपी रश्मी शुक्ला आहेत असे समोर आले आहे. माझा फोन टॅपिंग झाल्याचा आरोप मी केला होता. विधानसभेतही हा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी रश्मी शुक्ला आणि संबंधित व्यक्तींवर ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा ठोकणार आहे.
देवेंद्र फडणवीस सरकार असताना २०१७-१८साली नाना पटोले. बच्चू कडू यांच्यासह भाजपाचे काही आमदार खासदार, मंत्री, आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदशीरपणे टॅप करण्यात आले होते. तर २०१९ साली सरकार स्थापनेवेळी संजय राऊत व एकनाथ खडसे यांचे फोन टॅप करण्यात आले होते.
