दिशा सालियनप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे गोत्यात

0
नारायण राणे

दिशा सालियनप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे गोत्यात..

मुंबई, दि. २७ फेब्रुवारी:

अभिनेत्री दिशा सालियन प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दिशा सलियनबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाला पोलिसांनी अहवाल सादर केल्यानंतर हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे पोलिसांच्या अहवालात स्पष्ट झाले आहे तसेच ती गरोदरही नव्हती. पोलिसांनी महिला आयोगाला यासंदर्भात अहवाल दिला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पत्र लिहून भाजप नेते नारायण राणे हे दिशा सालियन प्रकरणात असंवेदनशील राजकारण करून दिशा सालियन व त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती.

महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या काही सदस्यांनी दिशाच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्यावेळी सालियनच्या पालकांनी देखील राजकीय स्वार्थासाठी आमच्या मुलीची नाहक बदनामी केली जात असल्याचा आरोप करत महिला आयोगाकडे तक्रार केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *