युक्रेनमधील विद्यार्थ्यांपेक्षा पंतप्रधानांना निवडणुका महत्त्वाच्या !

0
PM II

युक्रेनमधील विद्यार्थ्यांपेक्षा पंतप्रधानांना निवडणुका महत्त्वाच्या !

मुंबई दि. २५ फेब्रुवारी:

शिक्षणासाठी भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात सुखरुप परत आणा असे पंतप्रधानांना ट्वीट करुन सांगितले होते परंतु त्यांना उत्तरप्रदेश आणि इतर निवडणूकांपेक्षा या देशात काहीच महत्वाचे वाटत नाही, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे.

जयंत पाटील म्हणाले, ज्यावेळी निवडणूका देशात सुरू होतात त्यावेळी केंद्र सरकारमध्ये काम करणाऱ्या लोकांना कशातच रस नसतो असा अनुभव आहे. युक्रेन मध्ये आपले विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परत आणा असे आठ दिवसापूर्वी केंद्र सरकारच्या प्रमुखांचे लक्ष ट्वीटच्या माध्यमातून वेधले होते परंतु कोणतीच कार्यवाही झाली नाही.

युक्रेनमध्ये आता युध्द सुरू झाले आहे. या संकटात विद्यार्थी सापडले आहेत. मी ट्वीट करुन मागणी केली त्याचवेळी प्रयत्न केला असता तर आज विद्यार्थी सुरक्षित राहिले असते. आज ते असुरक्षित आहेत. याची नोंद अगोदरच घ्यायला हवी होती परंतु केंद्र सरकारने घेतली नाही, आतातरी नोंद घेतील असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *