कोळीबांधवांची अस्तीत्वाची लढाई भाजप खांद्याला खांदा लावून लढेल !
कोळीबांधवांची अस्तीत्वाची लढाई भाजप खांद्याला खांदा लावून लढेल !
मुंबई, दि. 25 फेब्रुवारी:
ज्या कोळीबांधवाच्या कोळीवाडे गावाठाणांसह घराचा प्रश्न, मार्केटचा प्रश्न, मालमत्ता कराचा प्रश्न, डिझेल परताव्याचा प्रश्न ठाकरे सरकारने सोडवला नाही त्या ठाकरे सरकारच्या विरोधात लढाई लढताना आता कोळीवाबांधवाना आपली अस्तीत्वाची लढाई लढायची आहे, त्यासाठी आपल्या सोबत भाजपा सदैव राहिल, अशी ग्वाही भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी दिली.
भारतीय जनता पार्टी मच्छिमार सेल तर्फे माहिम येथे मोफत शितपेटी वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळ आशिष शेलार म्हणाले की, मुळ मुंबईकर असलेल्या कोळी बांधवाला यावेळीच्या निवडणुकांमध्ये आपल्या अस्त्िात्वाची लढाई लढावी लागणार आहे. कारण एवढी वर्षे गावठाण कोळीवाडयांचे सिमांकन झाले नाही. भाजपाचे राज्यात सरकार आल्यानंतर सिंमांकनाच्या कामाला सुरूवात झाली पण सरकार बदलले आणि सिंमांकनाचे काम थांबले. त्यामुळे पुर्नविकास होऊन हक्काचे घर मिळण्याचे स्वप्न मुळ मुंबईकरांचे मागे पडले आहे. तसेच कोळीवाडयांसाठी स्वतंत्र डिसीआर असावा अशी मागणी आम्ही वारंवार करीत असून देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने हे काम सुरू केले होते आता ते अंतीम टप्यात आहे, पण त्याला ठाकरे सरकारने मंजूरी दिलेली नाही. 500 चौ. फु. च्या घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला असून मुळ मुंबईकरांच्या कोळीवाडयातील घरांना सरसकट माफी द्या अशी मागणी आम्ही केली पण ठाकरे सरकारने ते मान्य करायला तयार नाही वरळीला सागर किनारी कोस्टल रोडची कामे सुरु आहेत कोळीवाडयातील नागरीक वारंवार त्याबाबत आपले म्हणणे मांडत आहेत पण सरकार ऐकुन घ्यायला तयार नाही.

समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पही कोळी बांधवांवर लादला जातोय. या प्रकल्पांमुळे कोळी बांधवाचा मासेमारीचा व्यवसाय धोक्यात आला आहे. मासे सुकवण्याच्या जागा धोक्यात आल्या आहेत. तर मच्छिमार्केटचा पुर्नविकास न झाल्याने तसेच परवाने न दिल्याने कोळी बांधवांचे मार्केटमध्ये गाळे गमवावे लागत आहेत. मत्सव्यवसाय मंत्री याकूब मेमनचे समर्थन करण्यात मशगुल आहेत त्यांना कोळी बांधवांच्या डिझेल परताव्याच्या प्रश्नाकडे बघण्यास वेळ नाही. अशा प्रकारे घर, व्यवसाय, मार्केट, बोटी या सगळयांसाठी संघर्ष करायचा आहे. येणा-या काळात ही लढाई अस्त्िात्वासाठी लढावी लागणार आहे. या लढाईत कोळी बांधवांसोबत भाजप खांद्याला खांदा लावून लढेल, अशी ग्वाही ही आमदार अॅड आशिष शेलार यांनी यावेळी दिली.
