आशिष शेलारांनी भराडी देवीला काय साकडे घातले ?
आशिष शेलारांनी भराडी देवीला काय साकडे घातले ?
मुंबई, दि. 24 फेब्रुवारी:
माझ्या भराडी देवी माते कौल दे, मुंबई महापालिकेत आमका यश यवं दे, टक्केवारी, लुटमार करतले ते हरान दे मुंबैकराची ईडापीडा टळानं दे, या येळेस…25 वर्षं भ्रष्टाचार करणाऱ्यांका घरात बसान दे..चाकरमान्यांचे मुंबईत हाल करणाऱ्यांका तेंची जागा दाखन दे! माते कौल दे!! असे साकडे भाजपा आमदार आशिष शेलार यांनी भराडीदेवाला घातले…
आंगणेवाडीच्या जत्रेच्या निमित्ताने भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, भाजपा नेते आमदार आशिष शेलार आणि पालिका गटनेते प्रभाकर शिंदे यांनी (मालवण) आंगणेवाडीला जाऊन भराडीदेवीचे दर्शन घेतले.
कोकणवासियांची अपार श्रद्धा असलेल्या भराडी देवीची जत्रा सुरू झाली असून आमदार आशिष शेलार यांनी आंगणेवाडीला जाऊन दर्शन घेतले. कोकणातील राजकीय नेते आवर्जून या यात्रेत हजेरी लावून दर्शन घेत असतात ही देवी नवसाला पावणारी असल्याची श्रध्दा असल्याने देवीकडे कोणी काय मागणे मागितले यावर, याबाबतची रंगतार चर्चा राजकीय वर्तुळात होत असतात.
