राजाराम देशमुख यांचा “मराठा भुषण पुरस्काराने” सन्मान
राजाराम देशमुख यांचा “मराठा भुषण पुरस्काराने” सन्मान.
ठाणे, दि. 24 फेब्रुवारी:
काँग्रेस नेते व सिद्धिविनायक देवस्थानचे विश्वस्त राजाराम देशमुख यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत ‘सकल मराठा समाज ठाणे’ यांच्या वतीने त्यांचा
“मराठा भुषण पुरस्काराने” सन्मान करण्यात आला.
कॉंग्रेस पक्षामध्ये काम करत असताना राजाराम देशमुख यांनी विविध पदे भूषविली व पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली. गोरगरीब जनतेसाठी सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून असंख्य कुटुंबाचे ते माय – बाप बनले..जनावरांसाठी मोफत चारा छावण्या उभ्या करणे, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबीरे, पिण्याच्या पाण्यासाठी सिंटेक्स टाक्या, मेंढपाळांना मदत, कोरोना संकटात सॅनिटाइजर, मास्क, पीपीई किट, हॅंन्डग्लोज, थर्मामीटर अशी साधने लोकांपर्यंत पोहोचवली.

कोरोना काळात अडकलेल्या देशभरातील गलाई बांधवांना सुखरूप पुणे स्थलांतरित करण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. गरजु विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, दुष्काळी भागातील लोकांना थेट मदत पोहचवली. पूरग्रस्त भागातील लोकांना अन्नधान्याचे वाटप केले. युवकांसाठी दहीहंडीचा कार्यक्रम, विविध आंदोलनामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग राहिला आहे.
राजाराम देशमुख यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत “सकल मराठा समाज ठाणे”च्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले.
यावेळी सकल मराठा समाज ठाणेचे अध्यक्ष नगरसेवक रविंद्र आंबरे, संजय केळकर, निरंजन डावखरे, नगरसेवक कृष्णा पाटील, राजेंन्द्र देशमुख व असंख्य शिवभक्त उपस्थित होते
