रशिया- युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थांना मायभूमीत परत आणा !
रशिया- युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थांना मायभूमीत परत आणा !
मुंबई दि. २० फेब्रुवारी :
मोदीजी विद्यार्थी हे आपले भवितव्य आहे.त्यांना लवकरात लवकर मायभूमीत परत आणण्यासाठी प्रयत्न करा अशी विनंती करणारे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करून केले आहे.
युक्रेनच्या लष्कराने युध्द सुरू झाले असल्याचे पत्रक काढून नागरीकांना सतर्क केले आहे. तर रशियातील बंडखोर यांनीही युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने घराबाहेर पडू नका असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत जयंत पाटील यांनी हे ट्विट केले आहे
रशिया आणि युक्रेन या देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या भागात १८ हजारपेक्षा जास्त भारतीय अडकलेले आहेत. त्यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.त्यांना मदत हवी आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेवर लक्ष द्या असेही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
