दिशा सालियन व सुशांतसिंगच्या हत्यांमागे कोण ?

0
नारायण राणे

दिशा सालियन व सुशांतसिंगच्या हत्यांमागे कोण ?

मुंबई, दि. १९ फेब्रुवारी;

केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांनी शिवसेना व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल करत सुशांतसिंग राजपुत व दिशा सालियान मृत्यु प्रकरणाला पुन्हा हवा दिली. दिशा सालियनवर  बलात्कार कोणी केला? सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे? असे प्रश्न उपस्थित केले. मातोश्री दोन या इमारतीच्या मुद्दावरूनही राणेंनी शिवसेनेला डिवचले.

पत्रकार परिषदेत नारायण राणे म्हणाले, 8 जूनला दिशा सालियनची बलात्कार करून हत्या झाली. तिच्यावर बलात्कार होत असताना बाहेर प्रोटेक्शन कुणाचे होते. तिचा पोस्टमार्टेम अहवाल का आला नाही? त्या इमारतीतील रजिस्टरची ८ जूनची पानं कुणी फाडली. कुणाला इंटरेस्ट होता ? असे सवाल त्यांनी विचारले. सुशांतसिंगला हे सर्व कळाले होते त्यानंतर काही लोक त्याच्या घरी गेले, त्याची हत्या केली गेली तेव्हा कोणत्या मंत्र्यांची गाडी होती. त्याच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे गायब कुठे झाले. ठराविक माणसांची अॅम्ब्युलन्स कशी आली. हॉस्पिटलला कोणी नेले, याची चौकशी होणार. रमेश मोरे, जयंत जाधवची हत्या का झाली? आम्ही काढले तर खोलात जाईल, असा इशाराही राणेंनी दिला.

मातोश्री पार्ट टू केली आम्ही काय म्हणालो. पार्ट टूचे बेकायदेशीर पैसे भरून रेग्युलर केले. त्यांच्या दोन्ही बिल्डिंगचे प्लान माझ्याकडे आहेत पण मी कुणाच्या घरावर किंवा नोकरीवर जात नाही, असेही राणे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *