20200807_134202
‘मैने प्यार किया’ वाली ‘भाग्यश्री’ आज अशी दिसते!
मुंबई, दि. 7 ऑगस्ट
सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ आठवत नाही असं कोणीच नसेल. किमान हा सिनेमा आला त्या काळात जे काॅलेजला होते त्यातील अनेकांनी हा सिनेमा दोन-चार वेळा तर नक्कीच पाहिला असेल. या सिनेमाने सलमानला हिरो म्हणून जशी ओळख मिळाली तशीच आणखी एका सुंदर चेह-यालाही या सिनेमाने एका रात्रीत स्टार बनवले….ती म्हणजे हिरोईन भाग्यश्री !
अहो, आपली मराठमोळी सांगलीच्या पटवर्धन घरातली ती भाग्यश्री !
सुंदर, सालस, सोज्वळ दिसणारी भाग्यश्री (सुमन) एकाच हिटमुळे करोडोंच्या ‘दिल की धडकन’ बनली होती. ‘मैने प्यार किया’ ने तर अक्षरशः धुमाकूळ घातला. या चित्रपटानंतर सलमान व भाग्यश्री दोघांचा भाव इंडस्ट्रीत वाढला…..
सलमानची तर ‘निकल पडी’ पण भाग्यश्रीने मात्र चित्रपट स्विकारले नाहीत….
तीच्या नव-यालाच हिरो म्हणून घेतलं तर काम करेन अशी अट तीने घातल्याने निर्मात्यांनी तीचा विचार सोडला….अनेक वर्ष भाग्यश्री इंडस्ट्रीपासून दूरच राहिली….आपण, आपला नवरा, मुलं, कुटुंब, यातच ती रमली…आता भाग्यश्रीला इंडीस्ट्रीत काम करून 30 वर्षे झाली, तीचा मुलगा आता इंडस्ट्रीत काम करण्यास उत्सुक आहे…
या दरम्यानच्या काळात भाग्यश्रीने काही तेलुगू, कन्नड, तमिळ चित्रपट केले तर काही जाहिरातीमधूनही सध्या ती दिसते.. एवढंच नाही तर भाग्यश्री आता नवीन सिनेमातही काम करतेय…… ‘बाहुबली’ प्रभासबरोबर ती चित्रपटातून कमबॅकही करतेय….’कंगणा’बरोबर तमिळ चित्रपट ‘थलायवी जयललीता’ यातही ती काम करत आहे….हे दोन्ही चित्रपट लाॅकडाऊन संपला की रिलीज होतील.
एवढी वर्षे झाली आता ‘ती’ कशी दिसते याची तुम्हाला उत्सुकता लागली असेलच…आजही भाग्यश्री एकदम ‘फिट अन् फाईन’ आहे. ती दररोज वर्काऊट करते.. तीला पहाल तर तुम्हीही म्हणाल अरे ही कोण नवी स्टार !! आताच्या नव्या हिरोईन्सना पण लाजवेल अशी दिसते भाग्यश्री…..आणि हो तुम्ही तीला ‘मैने प्यार किया’मध्ये बघितले होते तशी साडीतली सोज्वळ सुमनसारखी नाही तर एकदम ग्लॅमडाॅल, दिसतेय भाग्यश्री !!
फोटो- भाग्यश्रीच्या FB wall वरून साभार…….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *