कोविड रूग्णांसाठी खा. श्रीकांत शिंदेचा पुढाकार!
मीरा भाईंदर महापालिकेला खा. डाॅ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन कडून रुग्णवाहिका!
कोविड रुग्णांच्या सेवेसाठी विशेष योगदान!
ठाणे, दि. 7 ऑगस्ट
मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातील कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत मीरा भाईंदर शहर आणि परिसरातील कोविड१९ रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहोचण्याकरिता कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून सर्व सुविधांनी सुसज्ज रुग्णवाहिका आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते मीरा भाईंदर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्यात आली.
यासमयी खासदार राजन विचारे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीमती गीता जैन, आमदार रविंद्र चव्हाण, महापौर सौ.ज्योत्सना हसनाळे, महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
शिवसेना नेते तथा राज्याचे पर्यटन,पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या ३० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या वतीने एकूण ३० रुग्णवाहिका लोकार्पित करण्यात आल्या होत्या. येणाऱ्या काळात ठाणे जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात तसेच पालघर जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांच्या सोयीसाठी खा. डॉ. श्रीकांत शिंदे फौंडेशनकडून रुग्णवाहिका देण्यात येणार आहे.
