किरीट सोमय्यांवर ७.५ हजार कोटी रुपयांच्या महावसुलीचा आरोप

0
1234

MUMBAI,OCT 28 (UNI) - Politician of the Bharatiya Janata Party Kirit Somaiya addressing press confrence on issue of 900 cr land scam by BMC and Thackraye sarkar,in Mumbai on Wednesday. UNI PHOTO-92U

किरीट सोमय्यांवर ७.५ हजार कोटी रुपयांच्या महावसुलीचा आरोप

मुंबई, दि. १७ फेब्रुवारी

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर आणखी एक बॉम्ब टाकला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने लोकांना धमकावून ७५०० कोटी रुपयांची वसुली केली आहे, असा आरोप करुन राऊतांनी एकच खळबळ उडवून दिली.

प्रसार माध्यमांशी बोलनाता संजय राऊत म्हणाले, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बोगस सह्या केला तसेच फडणवीस व अमित शाह यांच्या नावाने किरीट सोमय्यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कोटी रुपयांची वसुली करण्यात आली. पवई पेरूबाग जमीन प्रकरणी ४३३ बोगस लोकांना घुसवून प्रत्येकी २५ लाख रुपये किरीट सोमय्यांच्या दलालांनी घेतले. हा २०० ते ३०० कोटींचा घोटाळा आहे. घोटाळ्याचे आपल्याकडे ट्रकभरुन पुरावे आहेत.किरीट सोमय्यांनी फक्त ईडीच्या नावे नव्हे तर फडणवीसांच्या नावेदेखील वसुली केली आहे. त्यांनी फडणवीसांना ५० कोटी देणार असल्याचे सांगितलं होते. आपल्या मागे काय चाललंय हे फडणवीसांना माहित नसावे. असे घोटाळे फडणवीस करतील असे मला वाटत नाही पण त्यांच्या नावे हा घोटाळा करण्यात आला असून संबंधित सर्व कागदपत्रे मी तपास संस्थांना दिली आहेत. आता मुख्यमंत्र्यांना भेटून या सगळ्या प्रकाराची माहिती देणार आहे.

आता मी रोज भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार आहे. लोकं समोरुन येऊन माहिती देत असून किरीट सोमय्यांची एकूण २११ प्रकरणे समोर आली आहेत. त्यांनी गेल्या काही वर्षात साडे सात हजार कोटी जमा केले आहेत. पवईतील अनेक लोक माझ्याकडे आले आहेत. किरीट सोमय्या आपल्याच चपलेने स्वत:लाच मारणार आहे. महाराष्ट्राचे लोक त्यांची कपडे काढून धिंड काढणार आहेत. चंद्रकांत पाटील वैगेरे भाजपाचे काही नेते मधे पडत आहेत पण त्यांनी मध्ये पडू नये अन्यथा उघडे पडतील. लोक सोमय्यांची धिंड काढणार असून त्यात तुम्ही सहभागी झालात तर लोक तुमचेही कपडे काढतील असे राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *