संजय राऊतांचे आरोप कारवाईच्या भितीने !
संजय राऊतांचे आरोप कारवाईच्या भितीने !
मुंबई, १६ फेब्रुवारी :
आपले गैरव्यवहार उघडकीला येण्याची चिन्हे दिसू लागल्याने शिवसेना नेते संजय राऊत हे अस्वस्थ झाले असून या अस्वस्थतेमुळेच ते भाजपा नेत्यांवर बेताल आरोप करू लागले आहेत. मुख्यमंत्री होण्याच्या महत्वाकांक्षेने पछाडलेल्या राऊत यांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून हटविण्याची सुपारी घेतली आहे. असा आरोप केंद्रीय मध्यम, लघु व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.
नारायण राणे म्हणाले की, मोठा गाजावाजा करत राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. मात्र या पत्रकार परिषदेत त्यांना भाजप नेत्यांविरुद्ध सबळ पुराव्यानिशी आरोप करता आले नाहीत. राऊत यांनी पत्रकार परिषदेत बिनबुडाचे आरोप केले. राऊत यांच्याजवळ कोणाच्याही गैरव्यवहाराचे पुरावे असतील तर त्यांनी ते केंद्रीय तपास यंत्रणांच्या स्वाधीन करावेत.
प्रविण राऊत यांनी अंमलबजावणी संचालनालयाच्या चौकशी दरम्यान दिलेल्या जबाबामुळे संजय राऊत हे कमालीचे अस्वस्थ झाले आहेत. आपल्या गैरव्यवहारांची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागल्याने कारवाई होण्याची भीती त्यांच्या मनात आहे. या भीतीपोटी आलेल्या वैफल्यामुळे ते भाजपा नेत्यांवर असभ्य भाषेत आरोप करू लागले आहेत. सुजीत पाटकर यांच्या कंपनीत राऊत यांच्या कन्या संचालक कशा असा सवालही राणे यांनी केला.
