20220215_210233

असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही !

मुंबई, १५ फेब्रुवारी :
गेले काही दिवस फार मोठे काही तरी प्रकरण बाहेर काढणार असे वातावरण निर्माण करून शिवसेना खा. संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली पण ‘खोदा पहाड निकला चूहा’ असे झाले, अशी प्रतिक्रिया
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दिली .

चंद्रकांत पाटील म्हणाले की, असे नुसते आरोप करण्याने काही होत नाही, पुरावे असतील तर तपास यंत्रणांना द्या आणि त्यांनी काम केले नाही तर न्यायालयात जा. असल्या पोकळ धमक्यांना कोणी घाबरत नाही. या पत्रकार परिषदेसाठी खूप वातावरण निर्मिती केली, पण गर्जेल तो पडेल काय, असे झाले. एखादा माणूस अडचणीत आला की, थयथयाट करतो, तसा प्रकार संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत दिसला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *