मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकणार
मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकणार..
मुंबई, दि ११ फेब्रुवारी :
मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपाचं कमळ खुलणार आणि मुंबई महानगरपालिकेवर भाजपाचा झेंडा फडकणार असे विश्वास मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला.
दादर येथील वसंत स्मृति, मुंबई भाजपा कार्यालयात आयोजित मुंबई भाजपा झोपडपट्टी मोर्चाच्या बैठकीत ते बोलत होते.
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई भाजपा अध्यक्ष व आमदार मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबई भाजपा झोपडपट्टी मोर्चा “अभ्यास वर्ग” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना मंगल प्रभात लोढा म्हणाले की, मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणात मोठया प्रमाणात गैरप्रकार होत असून झोपडीवासीयांच्या समस्या सोडवण्यात मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असणारा पक्ष अपयशी ठरत आहे. महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबई झोपडपट्टी वासियांचे महत्त्व अमूलाग्र आहे. मुंबई झोपडपट्टी परिसरात भेडसवणाऱ्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करा तसेच प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करा. कोरोना काळातील परिस्थिती तसेच फेरीवाल्यांना येणारा अडचणींचा आढावा घेण्याचा प्रयत्न करा.
