क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या पूर्णाकृती पुतळयाचे 14 फेब्रुवारीला अनावरण

0
IMG-20220209-WA0087

क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या पूर्णाकृती पुतळयाचे 14 फेब्रुवारीला अनावरण.

पुणे, दि. 11 फेब्रुवारी:
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळयाचे 14 फेब्रुवारी रोजी अनावरण होणार असून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ परिसरातील कार्यक्रमस्थळाची पाहणी करून तयारीचा आढावा घेतला.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात साकारण्यात आलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १४ फेब्रुवारी रोजी अनावरण करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन तर कार्यक्रमस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. ऐतिहासिक असा कार्यक्रम होणार होणार असल्याने नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावे, अशा सूचना सामंत यांनी दिल्या. बैठकीनंतर सामंत यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसराची पाहणी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *